देवळाली प्रवरा (प्रतिनिधी) प्रहार जनशक्ती पक्षाचे जिल्हा प्रमुख ज्ञानेश्वर सांगळे व युवक जिल्हाप्रमुख पांडुरंग औताडे यांनी नुकतीच प्रहार जनशक्ती पक्षाची देवळाली प्रवरा शहर कार्यकारिणी जाहीर केली असून जिल्हा उपाध्यक्ष आप्पासाहेब ढूस यांचे हस्ते व श्रीरामपुर विधानसभा मतदारसंघ प्रमूख चंद्रकात कराळे यांचे प्रमूख उपस्थिती मध्ये नवनियुक्त पदाधिकाऱ्यांना प्रमाणपत्र देऊन सन्मानित करण्यात आले.
यामध्ये देवळाली प्रवरा शहर प्रमुख पदी प्रकाश वाकळे, उपप्रमुख पदी अशोक देशमुख, शहर संघटक पदी सुनील कदम व इम्रान शेख यांची तर राहुरी फॅक्टरी शहर प्रमुख पदी शरद खांदे, उप प्रमूख पदी अमोल साळवे,तसेच संपर्क प्रमूख पदी गणेश भालके व संघटक पदी हेमंत विश्वासराव,सनी सोनवणे, प्रभाकर कांबळे यांची निवड करण्यात आली.
महिला कार्यकारीणी मध्ये देवळाली प्रवरा महिला शहर प्रमुख पदी भाग्यश्री कदम, तर उप प्रमुख पदी सुरेखा शिंदे आणि राहुरी फॅक्टरी महीला शहर प्रमुख पदी रजनी कांबळे व उप प्रमूख पदी लैला शेख व अफसाना सय्यद यांची निवड करण्यात आली.श्रीरामपूर विधानसभा मतदारसंघ उपाध्यक्ष पदी किरण पंडित यांची व संघटक पदी राजेश मंचरे यांची यावेळी निवड करण्यात आली.
देवळाली प्रवरा येथे झालेल्या छोटेखानी कार्यक्रमात सर्व नूतन पदाधिकाऱ्यांना प्रमाणपत्र देऊन सन्मानित करण्यात आले व प्रहारचे संस्थापक अध्यक्ष बच्चु कडू यांचे मार्गदर्शनाखाली प्रहारची विचारधारा समाजातील शेवटच्या घटकापर्यंत पोहचविण्यासाठी जिल्हा प्रमुख यांचे वतीने आप्पासाहेब ढूस यांनी नूतन पदाधिकाऱ्यांना शूभेच्छा दिल्या.
