नाशिक (दिनकर गायकवाड) येथील मखमलाबाद परिसरातील स्वामी विवेकानंदनगर येथे ओम् दुर्गामाता मित्रमंडळाच्या वतीने डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची १३४ वी जयंती अनोख्या पद्धतीने साजरी करण्यात आली.
यावेळी बाबासाहेबांचे निवासस्थान राजगृह व काळाराम मंदिराची माती व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी सत्याग्रह केलेल्या चवदार तळ्याचे पाणी भीम अनुयायांना दर्शनासाठी सामाजिक कार्यकर्ते ज्ञानेश्वर काकड यांनी उपलब्ध करून दिले.
यावेळी या कलशांचे भीम अनुयायांनी दर्शन घेऊन डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना जयंतीनिमित्त अभिवादन केले. या कार्यक्रम प्रसंगी नागरिकांना संबोधित करताना सामाजिक कार्यकर्ते तथा अमृतवन योग
परिवाराचे संयोजक ज्ञानेश्वर काकड यांनी डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या कार्याला उजाळा दिला. त्याचबरोबर सर्व भीम अनुयायांना डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त शुभेच्छा दिल्या.
यावेळी माजी नगरसेविका सुनीता पिंगळे, ज्ञानेश्वर पिंगळे, सामाजिक कार्यकर्ते अंकुश काकड, गणेश काकड, समाधान बोडके, भूषण बच्छाव, राहुल जाधव, सतीश दिघे, विकास यादव, अज्ञात पगारे, मयूर भिल, सुनील दिघे, रवींद्र अहिरे, महेश दिघे, अविनाश शिरसाठ, दत्ता काळे, मनोज अहिरे, संदीप धात्रक, तुषार गांगुर्डे, विक्रम भालेराव, रमेश टोंगराज आदी उपस्थित होते.
