देवळाली प्रवरेला संवेदनशील बनविणाऱ्या मुद्द्यांवर अप्पासाहेब ढूस यांचे भाकित अखेर खरे!

Cityline Media
0
आंतरराष्ट्रीय खेळाडू आप्पासाहेब ढूस यांनी ४ नोव्हेंबर २०२३ रोजी देवळाली प्रवरा शहरा बद्दल लिहिलेले भाकित आज एप्रिल २०२५ मध्ये म्हणजे तब्बल दीड वर्षांनी खरे होताना दिसत आहे..
काय लिहिले होते त्यांनी.?

- इथे घडताहेत भावी दहशतवादी.!
- देवळाली प्रवरा शहरासाठी धोक्याची घंटा.!
- पालकांनो कार्टी सांभाळा ! 
महाराष्ट्र शासनाचा शिव छत्रपती पुरस्कार प्राप्त.. प्रथम भारतीय सुवर्णपदक विजेत्या आंतरराष्ट्रिय खेळाडूच्या घरी दि. २२/१०/२०२३ रोजी मध्यरात्री ०१.४५ च्या दरम्यान आलेल्या दहशतवाद्यांचा पोलीस यंत्रणेला सीसीटीव्ही फुटेज देवूनही अद्याप पर्यंत ते दहशतवादी मोकाट फिरत आहेत.
 त्यामुळेच कदाचित देवळाली प्रवरा शहरात तदनंतर आज पावेतो वाकान हद्दीतील कदम वस्ती तसेच तीन चारी भागातील वाळुंज वस्तीवर यशस्वी चोऱ्या झाल्या आहेत.  आणि, यापुढेही गावात चोरी व दरोड्याचे सत्र वाढण्याचे चिन्ह आहेत. असेच म्हणावे लागेल.

      देवांची आळी म्हणजेच देवांच्या पंगती ज्या ठिकाणी बसल्या होत्या त्या ८०० पेक्षा जास्त वर्षाचा इतिहास असलेल्या आणि ४० हजार चे जवळपास लोकसंख्या असलेल्या माझ्या देवळाली प्रवरा शहराला काही सत्तापिपासू राजकीय मंडळींमुळे सध्या ग्रहण लागले आहे.

गेल्या पन्नास वर्षात माझे गावात एकही शैक्षणिक संस्था या दहशवाद्यांना पोसणाऱ्या मंडळींनी काढली नाहीं. त्यामुळे गावाचा शैक्षणिक विकास खुंटला..! आणि, कमी शिक्षित तरुणाई राजकारणासाठी आयतीच यांना वापरायला मिळाली..! गेल्या पन्नास वर्षात माझे गावात एकही उद्योग या दहशतवाद पोसणाऱ्या मंडळींनी आणला नाही.त्यामूळे गावात बेकारीचे प्रमाण वाढले आहे. आणि, हिच बेकार तरुणाई या मंडळींनी हेरली.

       गावातील या तरुण मुलांना म्हणजे, ज्यांचेकडे आपण उद्याचे देशाचे भविष्य म्हणून पाहतो त्या भावी पिढीला सध्या ही राजकीय मंडळी अलगद आपल्या जाळ्यात अडकवित आहेत त्यांचेवर रात्री उशिरापर्यंत खर्च करुण त्यांना व्यसनाच्या नादी लावीत आहेत.. व त्यांची माथी भडकवून त्यांचेकडून विवीध प्रकारची गैर कामे करवून घेतली जात असल्याचे समोर येत आहे.  
      त्यामूळे,देवळाली प्रवरा हे एकेकाळी शांत आणि सुंदर शहर अशी ओळख असलेल्या या शहराला या वाया गेलेल्या किंवा घालवलेल्या काहीं तरुणांच्या हातून सतत दहशती खाली ठेवून स्वतःची राजकीय पोळी भाजून घेण्याचे काम काही मंडळी सातत्याने करीत असल्याचे दिसून येत आहे आणि,पोलीस यंत्रणाही तपासात दिरंगाई करून त्यांना सहकार्य करत असल्याचे जाणवत आहे.राजकारणात स्वतःचे खूप मोठे नातेसंबंध असल्याचे अभिमानाने सांगणाऱ्या लोकांना माझे देवळाली प्रवरा शहरात अद्याप पर्यंत एक साधे पोलीस ठाणे बांधता आले नाही.! की.., यांनी.. गावात यांची दहशत कायम ठेवण्यासाठी ते जाणीवपूर्वक होऊ दिले नाही हे, तपासण्याची वेळ आता आली आहे..! 

      आज माझे देवळाली प्रवरा शहर अशांत ठेवण्याचे काम येथील काहीं राजकीय मंडळी पडद्याआडून सतत करीत आहेत. गावात कोणताही तणाव निर्माण झाला की समजावे या मंडळींनी काहीतरी उद्योग वाढवून ठेवला आहे. आणि, तसे झाले की, त्यांचे बगलबच्चे ठरल्या प्रमाणे कुणा तरी विरोधकाला टार्गेट करुण सोयीस्कररित्या गावाच्या मागे लपतात व विरोधकांना बदनाम करण्याचा प्रयत्न करतात हे आता गावाला नित्याचे झाले आहे अन् गावातील बिचारी भोळी भाबडी जनता यांच्या कुटिल कारस्थानापासून कोसो मैल दूर असल्याने ती यांच्या कारस्थानाला नकळत बळी पडते आणि,यांचा कार्यभाग साधला जातो.

गावात घडणारी कोणतीही घटना आसो जसे की व्यापाऱ्यांच्या दारात गाडी आडवी लावुन त्यांना वेठीस धरणे असो किंवा,शनिवारी एखाद्या गरीब व्यापाऱ्याचा भाजीपाला उधळून त्याच्या वजन काट्यावर गाडी घालने असो तसेच,कुणी गरीब व्यक्ती रस्त्याच्या कडेने सायकल वर जात असेल तर त्याला मारहाण करणे असो.,त्याच बरोबर एखाद्याची मालवाहतूक गाडीचे आरसे फोडणे असो.,अश्या.,एक ना अनेक गोष्टी करुण गावात सतत दहशत निर्माण करण्याचे काम ही मंडळी सातत्याने करीत आली आहे इतक्यावरच ही मंडळी थांबत नाहीत, गावात जर एखाद्याची मालमत्ता यांना आवडली तर त्या मालमत्तेच्या मालकाला धमकावून किंवा, वेळ प्रसंगी त्या मालमत्तेत असलेल्या उभ्या पिकाची मध्यरात्री चोरी करून ही मंडळी आपला कार्यभाग उरकतात एकदा तर डॉ.तनपुरे साखर कारखाना कामगारांसाठी पाणी उपलब्ध करून देण्याची मागणी कामगारांनी केली तर,  निर्लज्जपणे स्वतः हिटलर असल्याचे ही राजकीय मंडळी जाहीरपणे सांगतात.
 
       आज गावात कोणताही अनुचित प्रकार घडला की,  संशयाची सुई काही विशिष्ठ राजकीय मंडळींकडेच का जाते..? उदा. हिंदूंचे मंदिर पाडण्याची धमकी असो.की, मुस्लिम बांधवांचे पवित्र मस्जिद चे पत्रे काढणे असो महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकर यांची प्रतिमा नगरपरिषदेच्या दालनातून बाहेर काढने असो की अजून किती पापं करणार आहेत हे आणि,असे संस्कार हे गावातल्या तरुणांना देणार आहेत का? भावी पिढीने यांचा काय आदर्श घ्यायचा..!

      सोशल मीडियाच्या माध्यमातून जातीवाचक पोस्ट व्हायरल करुण गावात जाती जातींमध्ये तेढ निर्माण करण्याचे काम जर कधी समाज विघातक मंडळीकडून झाले तर तिही यांचीच पिलावळ निघणार असो असे.. एक ना अनेक उद्योग करून गाव सतत तणावाखाली ठेवण्याचे काम करणाऱ्या मंडळींना कुणी थांबविणार आहे की नाही ? किती दिवस षंढ म्हणून जगणार आहोत आम्ही काहीं दिवसापूर्वी एका विशिष्ट समाजातील मुलीची गावात दहशतवाद पोसणाऱ्याच्या बगलबच्चेनी सोशल मीडियात एक व्हिडीओ व्हायरल केला व,जे काही ऐकावयास मिळाले ते धक्का बसविणारे आहे त्याचे झाले असे की, मुलीचा व्हिडीओ व्हायरल केला म्हणून जाब विचारण्यासाठी त्या मुलीचे चुलते त्या मुलाकडे गेले तिथे मुलासोबत तथाकथित दादा बसले होते.. वर बोट करून बोलायचे नाही..!
 
      अशी धमकीच त्या दा दा ने मुलीच्या चुलत्याला जेंव्हा दिली ते ऐकून मन अगदी विषण्ण झाले गावगुंडांना पाठीशी घालुन यांना गाव नेमकं कोणत्या दिशेला न्यायचे आहे?आसा त्यामुळे प्रश्न पडतो याही पूढे जावून आम्हाला नुकताच एक नविन अनुभव आला तो म्हणजे, जेंव्हा आम्ही मुळा धरणातून गावाने मीटरद्वारे विकत घेतलेले पाणी काही राजकिय मंडळी स्वतःचे दक्षिणेतील राजकारण निश्चित करण्यासाठी अर्ध्या तालुक्याला २४ तास मोफत वाटत असल्याचे पुराव्यासह गावाच्या निदर्शनास आणून दिले तेंव्हा याच मंडळींनी आमच्यामुळे पाईप लाईन फुटण्याचा कांगावा केला. याचाच एक भाग म्हणून आमचे घरी अर्ध्या रात्री दहशतवादी पाठवून आम्हाला भिती घालण्याचा केविलवाणा प्रयत्न केला आमच्या घरी झालेल्या त्या असफल दरोड्यामध्ये सीसीटीव्ही कॅमेरात कैद झालेले तरूण जर पाहिले तर, याच राजकिय मंडळींची बगलबच्चे असलेले हे गावातली तरूण कोणत्या दिशेला चालले आहेत हे पाहून गावाच्या भविष्याची चिंता वाटते

      गावातली या गुंड प्रवृत्तीच्या तरुणांचे धंदे काय? त्यांना शेती किती? त्यांचे उत्पन्नाचे साधन काय? त्यांच्याकडे लाखोंच्या गाड्या कुठून आल्या, त्यांचेकडे गावठी कट्टे असल्याची चर्चा आहे. हे सर्व कुठून आले असा प्रश्र्न गावातली सर्वसामान्य जनतेला पडला आहे. 
       या तरुणांना स्वतःकडे आकर्षित करून त्यांना दारू प्यायला पैसै देने आणि, मध्यरात्री त्या मुलांना विरोधकांच्या घरावर दहशत निर्माण करण्यासाठी पाठविणे हे कितपत योग्य आहे.? गावच्या मूलभूत प्रश्नांना समोर येवून उत्तरे देण्याची धमक यांच्यात राहीली नाही.म्हणून, अश्या कमी वयाच्या मुलांना जर घरावर दरोडा टाकण्यासाठी किंवा दहशत माजविनेसाठी या तरुणाईचा वापर होत असेल तर,पालकांनो कार्टी सांभाळा..!  असेच गावातील पालकांना म्हणावेसे वाटते..!

 आपला मुलगा रात्री दिड दोन वाजता उशिरा पर्यंत घरी थांबत नसेल तर, पालकांनी याची वेळीच दखल घेतली पाहिजे आपल्या मुलाची संगत कुणाशी आहे..? मुलाचा तो जोडीदार मित्र गुन्हेगार आहे का.? किंवा, त्याचे धंदे काय आहेत.?  हे सर्व बारकावे पाहणे प्रत्येक पालकाचे कर्तव्य आहे.! अन्यथा, एक दिवस तुमचा मुलगा दहशतवाद्यांच्या / दरोडेखोरांच्या यादीत जावून बसेल आणि त्याचे आयुष्य आणि करियर बरबाद होईल..!
      जर असे होत असेल तर उद्याच्या भावी पिढीला दहशतवादी बनविण्याचे पाप गावातील काही राजकिय मंडळी करीत आहेत. त्याला सर्वांनी  मिळुन आजच आवर घालणे गरजेचे आहे.नाहीतर माजी पंतप्रधान स्व. अटलबिहारी वाजपेयी हे  मुंबईवर झालेल्या अतिरेक्यांच्या प्राणघातक हल्ल्याच्या निमित्ताने संयुक्त राष्ट्रसंघाच्या सभेत बोललेले ते शब्द आजही मला आठवतात..! ते म्हणाले होते की, अतिरेक्यांना जात किंवा धर्म काहीं नसते आज आमच्यावर वेळ आली आहे याचा अर्थ तुम्ही सुरक्षीत आहात असं कुनी समजू नये उद्या तुमच्यावर सुध्दा ही वेळ येवू शकते..! त्यामूळे सर्वांनी मिळून या दहशतवादाचा बीमोड करायला हवा.! 
     आणि तदनंतर अमेरिकेवर हल्ला झाला तेंव्हा कुठे अमेरिकेचे डोळे उघडले.! 
       पाकिस्तानचेही तेच झाले दहशतवादाला खतपाणी घातले म्हणून त्यांना त्याची किंमत मोजावी लागली आहे. आज जगाच्या पाठीवर पाकिस्तानला कुठेही किंमत राहिली नाही.त्याच प्रमाणे गावातील या दहशतवादी प्रवृत्तीचा बीमोड करण्यासाठी सर्वांनी एकजूट दाखविणे गरजेचे आहे नाहीतर उद्या ही वेळ कुणावरही येवु शकते तसेच, कदाचित उद्या तुमचा मुलगा यांच्या नादी लागून मोठा दहशतवादी बनू नये म्हणजे झाले त्यापेक्षा
पालकांनो कार्टी सांभाळा!
 हा लेख लिहिण्याचा मुख्य उद्देश हाच आहे की माझेवर जो प्रसंग बेतला तो, उद्या तुमच्यावर येवू नये.आज माझे घरावर हल्ल्याचा जो असफल प्रयत्न झाला आहे त्यास १० दिवस उलटूनही पोलीस यंत्रणेने गंभीरतेने घेतलेले दिसत नाही.आ. बच्चु कडू यांनी यापूर्वीच राज्याच्या गृह विभागाला लेखी पत्र देऊन माझे जिवितास धोका असल्याने पोलीस संरक्षण देण्याची मागणी केली आहे. तरीही माझे घरावर मध्यरात्री आलेल्या दहशतवाद्यांना राज्याचे गृह विभाग हलक्यात घेत असेल तर येथील दहशतवाद पोसायला हा विभाग खतपाणी घालत आहे का ? असा प्रश्न सर्वसामान्य जनतेला पडला आहे. की, हा तपास लागुच नये म्हणून कुणी आपले राजकीय वजन वापरीत आहे हेही तपासून पहावे लागणार आहे.म्हणून, या दहशतवाद्यांवर कारवाई करण्यासाठीं आज पुनः सरकारला आम्ही स्मरणपत्र देत आहोत. त्यामूळे आशा आहे की.. माझे घरी दहशतवादी पाठविणारा मास्टरमाईंड कोन? हे लवकरच पोलीस शोधून काढतील..!

       कारण जर,एखाद्या आंतरराष्ट्रीय खेळाडूच्या घरी आलेले दहशतवादी शोधण्यास गृह विभागाला इतका उशीर लागत असेल तर राज्यातील सर्वसामान्य जनता नक्किच सुरक्षीत नाहीं.त्यामूळेच.. इथे घडताहेत भावी दहशतवादी!देवळाली प्रवरा शहरासाठी ही धोक्याची घंटा असून पालकांनो कार्टी सांभाळा..!

लेखक..
आप्पासाहेब भिमराज ढूस 
शिव छत्रपती राज्य साहसी क्रीडा पुरस्कार प्राप्त प्रथम भारतीय सुवर्णपदक विजेता आंतरराष्ट्रीय खेळाडू.. तथा, 
अध्यक्ष,  प्रहार जनशक्ती पक्ष, श्रीरामपूर विधानसभा मतदारसंघ. 
९८२३०३५९३६

४ नोव्हेंबर २०२३ रोजी आंतरराष्ट्रीय खेळाडू आप्पासाहेब ढूस यांनी केलेले  वरील भाकित आज एप्रिल २०२५ मध्ये खरे होताना दिसते आहे.. देवळालीकरानो...
 आपले काय मत आहे..?

Post a Comment

0Comments

Post a Comment (0)

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!