शेतकरी कर्जमाफीसाठी श्रीरामपूरचे आमदार हेमंत ओगले यांच्या घरासमोर प्रहारचे मशाल आंदोलन

Cityline Media
0

श्रीरामपूर (प्रतिनिधी) शेतकरी कर्जमाफी तसेच पेरणी ते कापणी पर्यंत खर्च एम एस ई आर जी एस मधून करणे आणि दिव्यांग बांधवांना सहा हजार रुपये मासिक मानधन देण्यासाठी नुकतेच  रात्री श्रीरामपूरचे आमदार हेमंत ओगले यांचे घरासमोर प्रहार जनशक्ती पक्षाच्या वतीने मशाल आंदोलन करून निवेदन देण्यात आले. 
प्रसंगी प्रहार जनशक्ती पक्षाचे जिल्हा उपाध्यक्ष आप्पासाहेब ढूस,श्रीरामपूर विधानसभा मतदारसंघाचे प्रमुख चंद्रकांत कराळे,श्रीरामपूर युवक तालुकाप्रमुख रघुनाथ शिंदे,देवळाली प्रवरा शहर प्रमुख प्रकाश वाकळे, राहुरी फॅक्टरी शहर प्रमुख शरद खांदे, श्रीरामपूर विधानसभा मतदारसंघ क्षेत्राचे उपाध्यक्ष किरण पंडित, देवळाली प्रवरा महिला शहर प्रमुख भाग्यश्री ताई कदम, राहुरी फॅक्टरी महिला शहरप्रमुख रजनीताई कांबळे, देवळाली प्रवरा महिला शहर उपप्रमुख सुरेखा शिंदे, राहुरी फॅक्टरी महिला शहरप्रमुख लैला शेख, वंदना कांबळे, तसेच राहुरी फॅक्टरी शहर संपर्कप्रमुख गणेश भालके, देवळाली प्रवरा शहर उपप्रमुख अशोक देशमुख आणि राहुरी फॅक्टरी व देवळाली प्रवरा शहर संघटक हेमंत विश्वासराव सनी सोनवणे, सुनील कदम, प्रभाकर कांबळे, इमरान शेख आदींनी निवेदनावर स्वाक्षरी करून या आंदोलनात उपस्थित राहून आमदार महोदयांना निवेदन दिले.

दिलेल्या निवेदनात म्हंटले आहे की,आम्ही आपणास या निवेदानाद्वारे कळवितो की,महाराष्ट्र शासनाने निवडणुकीपूर्वी सर्वपक्षीय आमदार महोदयांनी त्या त्या पक्षाची निवडणूक जाहीरनाम्यामध्ये शेतकऱ्यांना आश्वासन दिलेले होते की,आम्ही निवडून आल्यावर शेतकऱ्यांची संपूर्ण कर्जमाफी करणार आहोत. महाराष्ट्रातील शेतकऱ्यांचा विचार करता आसमानी संकट व वाढत्या महागाईने शेतकरी कर्जाच्या खायीमध्ये बुडालेला आहे.महाराष्ट्रात दिवसाला सात शेतकरी आत्महत्या करीत असल्याचा अहवाल सांगत आहे. नॅशनल क्राइम रेकॉर्ड यांच्यानुसार शेतकरी आत्महत्या करीत असल्याचे सिद्ध झालेले आहे.
 
       अशी परिस्थिती असताना विधानसभेमध्ये निवडणुकीच्या काळात आम्ही शेतकऱ्यांचे पुत्र आहोत अशी जनतेला साथ घालून निवडून आलेले आमदार महोदय कर्जमाफीच्या संदर्भात चकार शब्द बोलत नाही. अथवा त्या पक्षाचे प्रमुख या संदर्भात भूमिका घेत नाही. यासाठी महाराष्ट्र विचारवंत आणि लढवय्या व्यक्तीचा महाराष्ट्र आहे.

      एप्रिल महिन्यामध्ये ११ एप्रिल ही शेतकऱ्याचा आसूड लिहिणारे शेतकऱ्यांच्या समस्येला वाचा फोडणारे महात्मा फुले यांची जयंती तसेच ज्या संविधानाच्या बळावर आमदार महोदय लोकशाहीचे प्रश्न सोडविण्यासाठी विधानसभेमध्ये प्रतिनिधित्व करीत आहे तो हक्क देणारे त्या संविधान निर्माते महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती १४ एप्रिलला आहे या महापुरुषांच्या विचारांचे स्मरण करून देण्यासाठी गळ्यामध्ये निळा दुपट्टा व छत्रपतींचे नाव घेऊन सत्तेत आलेले सरकार शेतकरी आत्महत्या करीत असताना त्यांच्या कर्जमाफीसाठी हातात भगवा ध्वज व पेटती मशाल घेऊन आम्ही सर्व कार्यकर्ते मा.बच्चु कडू, प्रहार जनशक्ती पक्षाचे संस्थापक अध्यक्ष यांचे मार्गदर्शनात..
     शेतकरी कर्जमाफी, तसेच पेरणी ते कापणी पर्यंत खर्च एम एस ई जी एस मधून करणे बाबत आणि दिव्यांग बांधवांना सहा हजार रुपये मासिक मानधन देण्याबाबतच्या मागण्या घेऊन आलेलो आहोत.

     तेव्हा आपण विधानसभेमध्ये आवाज उठवावा व आमच्या रास्त न्याय हक्काच्या मागण्या मंजूर करून सर्व शेतकरी व दिव्यांग बांधवांना न्याय द्यावा याकरिता या मशालीचा उजेड आपण विधानसभेपर्यंत न्यावा याकरिता हे आंदोलन करण्यात येत असल्याचे निवेदनात म्हटले आहे.

    प्रसंगी आमदार हेमंत ओगले स्वतःनिवेदन स्विकारून आम्ही विधानसभेमध्ये हा आवाज वारंवार उचलत आलो असून येथून पुढेही शेतकरी कर्जमाफी असेल,दिव्यांगांचा प्रश्न असेल, त्याचबरोबर.. पेरणी ते कापणी पर्यंत खर्चाचा विषय असेल.. हे सर्व विषय विधानसभेच्या येत्या अधिवेशनामध्ये आम्ही नक्की मांडू असे आश्वासन आमदार हेमंत ओगले यांनी आंदोलन कर्त्यांना दिले.
Tags

Post a Comment

0Comments

Post a Comment (0)

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!