हिवरगाव पावसा येथे भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर संयुक्त जयंती महोत्सवाचे आयोजन

Cityline Media
0
महापुरुषांच्या संयुक्त जयंती महोत्सवाची प्रदीर्घ परंपरा 

संगमनेर नितीनचंद्र भालेराव
डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचे कार्य हे केवळ विशिष्ट जाती किंवा धर्मापुरते मर्यादित नव्हते. समता व बंधूत्वाच्या विचाराने मानवीयतेच्या दृष्टिकोनातून एकूणच आधुनिक भारताच्या निर्मितीत त्यांचे योगदान मोलाचे आहे.त्यामुळे या महामानवाला मानवंदना देण्यासाठी सर्व जाती व धर्माच्या व्यक्तींकडून एकत्रितपणे त्यांची जयंती साजरी करण्याची ९० च्या दशका पासून संगमनेर तालुक्यातील हिवरगाव पावसा येथे सुरूवात झाली.
महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकर,महात्मा फुले,बहुजन प्रतिपालक छत्रपती शिवाजी महाराज यांची संयुक्त जयंती साजरी करण्याची  प्रदीर्घ परंपरा अखंडपणे चालू आहे.यावेळी भव्य स्वरूप देण्याचे प्रयत्न संयुक्त जयंती महोत्सव समितीने केले आहेत.
येत्या १३ एप्रिल रोजी हिवरगाव पावसा येथे महापुरुषांच्या संयुक्त जयंती महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. 

१३ एप्रिल रोजी सकाळी ९ वाजता कॅनरा बँक चौकात मान्यवरांच्या उपस्थितीत अभिवादन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.तसेच सायंकाळी पाच वाजता पारंपारिक संवाद्य भव्य मिरवणुकीचे आयोजन करण्यात आले आहे.त्यानंतर रात्री आठ वाजता बुद्ध वंदना व स्नेहभोजनाचे आयोजन करण्यात आले आहे.

 महापुरुषांच्या संयुक्त जयंती महोत्सवानिमित्त हिवरगाव पावसा येथे मुख्य रस्त्याच्या दुतर्फा सुंदर अशी आकर्षक विद्युत रोषणाई,चौक सजावट केली आहे.महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकर,महात्मा फुले,बहुजन प्रतिपालक छत्रपती शिवाजी महाराज संयुक्त जयंती महोत्सवानिमित्त उपस्थित राहण्याचे आवाहन संयुक्त जयंती महोत्सव समिती, भीमशक्ती तरुण मित्र मंडळ सरपंच व ग्रामपंचायत हिवरगाव पावसा सर्व संस्था पदाधिकारी यांनी केले आहे.
Tags

Post a Comment

0Comments

Post a Comment (0)

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!