लोयोला सदन चर्च मध्ये झाली मिस्साबली
श्रीरामपूर (दिपक कदम) शहरातील लोयोला सदन चर्च येथे ख्रिश्चन धर्मियानुसार ग्रुडफ्रायडेच्या या दु:खाच्या दिवसातील अगोदरचा रविवार हा दिवस झावळ्याचा दिवस म्हणून साजरा केला जातो.याप्रमाणे लोयोला सदन येथील चर्चमध्ये झावळ्याची मिरवणूक लोयोला चर्च पासून संत मदर चौकापर्यंत व चौकापासून लोयोला सदन चर्च या ठिकाणी काढण्यात आली.
मिस्सादान अर्पण प्रमुख धर्मगुरु रे.फा.ऑल्विन मिस्कीटा यांनी मिस्सा अर्पण केला.यामध्ये लोयोला सदन चर्चचे प्रमुख धर्मगुरू रे.फा.प्रकाश भालेराव,रे.फा.विक्रम शिनगारे ,रे.फा.अनिल चक्रनारायण आदी धर्मगुरुनी सहभाग घेतला.
भक्तीमय या कार्यक्रम प्रसंगी सेंट लोयोला पॅरीस कौन्सिल, सेंट झेवियर्स फॅमिली,संत तुक सिस्टर्स, कनोसा सिस्टर्स, फा. हान्स स्टाफनर प्रतिष्ठाण, लोयोला दिव्यवाणी, सेंट लोयोला गायन मंडळ, युवक मंडळ, महिला ले- कनेशियन, कमलाकर पंडीत, विजय त्रिभुवन, प्रवीण सातारकर, लता बनसोडे, सुवर्णा बोधक, प्रतिमा पंडीत, अशोक साळवे, सुरेश ठुबे, डॅनियल साळवे, पुष्पा कोळगे विजया दळवी, ललित गायकवाड, शोभा त्रिभुवन, पुष्पा साठे, लुकस दिवे, दिपक कदम, भाऊसाहेब आढाव, रविंद्र लोंढे, बबलू लोंढे, संजय लोंढे, रविंद्र त्रिभुवन, सुनिल पारधे यांच्यासह सर्व ख्रिस्ती भाविक मोठ्या भक्तिभावाने सहभागी झाले होते
