नाशिक (दिनकर गायकवाड) नाशिक महानगरपालिका घनकचरा व्यवस्थापन नाशिकरोड विभाग जय भवानी रोड कार्यालय येथे क्रांतिसूर्य महात्मा जोतिबा फुले व भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती दिनानिमित्त जय भवानी रोड येथे कर्मचारी व मित्रपरिवाराच्या वतीने या महापुरुषांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून प्रतिमापूजन करण्यात आले.
यावेळी उपस्थित स्वच्छता निरीक्षक लोकेश गांगुर्डे, नगरपालिका कर्मचारी कामगार सेनेचे कोअर कमिटी सदस्य तुषार ढकोलिया, सुनील काळे, चेतन चटोले, बाळू रोकडे, संजय काकडा, सुरेंद्र बैद, विकास राठोड, सचिन कल्याणी, मयूर जीनवाल, बकुबाई पांडव, द्वारकाबाई रणशिंगे, मीना काळे, सरस्वती कल्याणी, कुसुम सकट, कल्पना लोंढे या सर्व कर्मचारी मित्र परिवार यांच्या उपस्थितीत अल्पोपाहार व मिठाईचे वाटप करण्यात आले.
