संगमनेर मध्ये कौतुक आणि अभिनंदन
नाशिक (दिनकर गायकवाड)
येथील धाडसी महिला नलिनी मधुकर कड यांनी नुकतेच वयाच्या ५२ व्या वर्षी एव्हरेस्ट बेस कॅम्प सर केला.तिरंगा झेंडा फडकावून नाशिकचे नाव उज्वल केले.विशेष म्हणजे ही मोहीम केवळ त्यांनीच पूर्ण केली.
त्यांच्या समवेत कोल्हापूरच्या नीलिमा देशपांडे होत्या.त्यांना शेवटच्या टप्प्यात मोहीम अर्धवट सोडावी लागली.मात्र दोघींनी एकमेकींना साथ देत खडतर परिस्थितीवर मात करीत आव्हान पेलले. दि. ६ तारखेला नलिनी कड यांनी नेपाळमधील काठमांडू गाठले.नंतर लुकरा येथून एव्हरेस्ट बेस कॅम्पकडे कुच केले.
सोबत एक नेपाळ येथील मार्गदर्शक होता. दररोज ८ ते १० तास चालत खडतर मार्गाने १० दिवसांत चढाई केली.सर्वत्र बर्फाचे पसरलेले थर,जीव गोठविणारी कडाक्याची थंडी, दाट धुक्यामुळे रस्ता डोळ्यांसमोरचा हरवलेला
नलिनी कड या योगशास्त्र तज्ज्ञ आहेत.योग शिक्षिका असून सायकलिस्ट,ट्रेकर या भूमिकेतून त्यांनी अनेक उपक्रमांमध्ये सक्रिय सहभाग नोंदवला आहे. त्यांनी धाडसीपणे विविध प्रसंगात अडकलेल्यांना सहाय्य करुन सुखरूप सोडविण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा केली आहे. अशा घटनांमध्ये त्यांनी महिला सुरक्षितता,सबलीकरण यासाठी आपले कौशल्यपणाला लावले. त्यांना कायमच त्यांचे पती व पंचवटी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक मधुकर कड यांची साथ असते.सौ.नलिनी या संगमनेर येथील दिवंगत पोलिस निरीक्षक आबासाहेब देशमुख यांच्या कन्या आहेत.त्यांना या उपक्रमासाठी त्यांची मुले नयन व मयंक आदींनी प्रोत्साहन दिले.
असताना नलिनी कड व नीलिमा देशपांडे यांनी हार मानली नाही. तहान भुकेवर मात करून ध्येय गाठले.
जिद्दीने मजल दरमजल करीत त्यांनी एव्हरेस्ट बेस कॅम्पवर पाऊल ठेवले. भारताचा राष्ट्रध्वज फडकावून गर्जा महाराष्ट्र माझा हे गीत त्यांनी गायले. याक्षणी त्यांना एव्हरेस्ट शिखर खुणावत होते.
आत्मविश्वास, जबरदस्त इच्छाशक्ती आणि योगशास्त्रातील यम, नियम, प्राणायाम यांचा या कठीण वाटचालीत त्यांना खूप उपयोग झाला.असे त्यांनी नमूद केले. दि.२२ रोजी सौ.नलिनी कड यांचे नाशिकला आगमन होणार आहे.
