विनाअनुदानित शिक्षकांच्या वेदना मांडत समाज मन सुन्न करणारी लालाय्लू कांदबरी-डॉ.सुधीर तांबे

Cityline Media
0
 -प्रा.संतोष भालेराव लिखित लालाय्लू कांदबरीचे दिमाखात प्रकाशन

 संगमनेर-नितीनचंद्र भालेराव विनाअनुदानित शिक्षकांच्या व्यथा,वेदना समाजाच्या मनपटलावर मांडत समाजातील वाचक मन सुन्न करणारी कादंबरी म्हणजे लालाय्यू असे प्रतिपादन पदवीधर मतदारसंघांचे माजी आमदार डॉ.सुधीर तांबे यांनी नुकतेच संगमनेर येथे केले.
संगमनेर येथील भाऊसाहेब गुंजाळ पाटील सह्याद्री ज्युनिअर कॉलेजच्या के.बी.दादा देशमुख सभागृहात नुकताच लालाय्लू या बृहृद कादंबरीचा प्रकाशन सोहळा मोठ्या दिमाखात पार पडला यावेळी ते बोलत होते.

पुढे बोलताना डॉ.सुधीर तांबे म्हणाले की प्रा.संतोष भालेराव लिखित लालाय्लू या बृहृद कादंबरीतून विनाअनुदानित शिक्षकांच्या व्यथा,शिक्षकांच्या समस्या वेदना,स्वप्ने,इच्छा- आकांक्षा समाजाच्या मन पटलावर मांडणाऱ्या आहे या कांदबरीतुन शिक्षकांच्या प्रश्नांकडे गांभीर्याने लक्ष वेधले आहे,लालाय्लु शिक्षण व्यवस्थेतील शेंड्या लावणारी प्रवृत्ती वाढत आहे त्याचे दर्शन या कादंबरीतून संतोष भालेराव यांनी घडवून आणले आहे.

 शिक्षण व्यवस्थेतील दाहकता या कादंबरीतून दिसून येते कादंबरी सर्वोत्तम आहे,सामाजिक वास्तव,लेखकाचे अनुभव विनाअनुदानित शिक्षकांच्या संवेदना यातून सहाशे पानाच्या मोठ्या कादंबरीचे लिखाण प्रकाशित झाले आहे.तसेच शासनाने भरमसाठ महाविद्यालयांना परवानगी दिली आहे,मात्र सर्वच महाविद्यालयांना अनुदान देण्यात येत नाही त्यांना अनुदान कसे? देणार हे सरकार निश्चित सांगू शकत नाही.शिक्षण खात्यातील भ्रष्टाचार वाढत आहे शिक्षकांकडून संस्थाचालकांच्या अवास्तव अपेक्षा,आर्थिक देवाणघेवाण शिक्षकाची होणारी पिळवणूक याचा स्पर्श या कादंबरीतून होत आहे.असे यावेळी ते म्हणाले 

प्रसंगी डॉ.सुधीर तांबे यांच्या हस्ते  कांदबरीचे प्रकाशन करण्यात आले.यावेळी संगमनेर नगरपरिषद नगराध्यक्षा दुर्गा तांबे, आर.बी.राहणे, विजय राहणे, शांताराम कढणे ज्येष्ठ लेखक प्रा.मा.रा.लामखडे,मा.
प्रधान जिल्हा न्यायाधीश तथा संस्थेचे सचिव सुमंत कोल्हे, सहसचिव तथा विशिष्ट आचार्य बाबुराव गवांदे,ज्येष्ठ लेखक प्रा.विठ्ठल म.शेवाळे,संगमनेर महाविद्यालय माजी इंगजी विभाग प्रमुख प्रा.डॉ रोहित कावळे,पुरोगामी लेखक प्रा.डॉ.राहुल हांडे,,संस्थेचे विश्वस्त मधुकर सोनवणे यांच्या सह इतर मान्यवरांच्या उपस्थितीत हा प्रकाशन सोहळा पार पडला

प्रसंगी कादंबरी प्रकाशन सोहळ्याचे आयोजन भाऊसाहेब संतुजी थोरात महाविद्यालयाचे प्राचार्य प्रा.डॉ.बी.डी.वाघ,उपप्राचार्य प्रा.डॉ.व्ही.एस.कोल्हे,सह्याद्री ज्युनिअर कॉलेज प्राचार्य प्रा..के.जी.खेमनर,सह्याद्री ज्युनिअर कॉलेज उपप्राचार्य प्रा.एस.पी.सुरसे, 
शिक्षक प्रतिनिधी प्रा.जी.एल.गुंजाळ,
शिक्षिका प्रतिनिधी
प्रा.क्यु.एच.सय्यद,शिक्षकेत्तर प्रतिनिधी एस.डी.आव्हाड,प्रा.नवनाथ डोंगरे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले होते.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा.जी.एल.गुंजाळ यांनी केले. तर प्रास्ताविक प्रा.नवनाथ गुंड यांनी केले.कार्यक्रमाचे आभार प्रा.एस.पी.सुरसे यांनी मानले.
सदरचा कादंबरी प्रकाशन सोहळा यशस्वी करण्यासाठी प्रा. रोझा देशमुख,प्रा.ज्योती रायते,प्रा.सुरेश घोरपडे, प्रा.नितीन नवले, प्रा.मनोज जगताप,प्रा.प्रवीण वर्पे,प्रा.
दादा पाटील दिघे,प्रा.उत्तम खेमनर,प्रा.बाबासाहेब दिघे, प्रा.संकेत मोरे,प्रा.ज्ञानेश्वर कोहकडे,प्रा.दिगंबर मुळे, प्रा.समीर लामखडे,प्रा.प्रकाश कोल्हे,प्रा.बाळासाहेब नवले, प्रा.बाळासाहेब गुंजाळ,प्रा.अबू इनामदार,प्रा.राजू जगताप, प्रा.संजय लबडे,प्रा.माधुरी भुसाळ,प्रा.सुलोचना कुटे, प्रा.तारामती सातपुते,अशोक भालेराव,भाऊसाहेब भालेराव,कैलास भालेराव, प्रा.रामदास वाघ प्रा.अनिल गवारे,प्रा.जयश्री कडलग, प्रा.रुपाली सुपेकर,
प्रा.निलेश सूर्यवंशी,प्रा.सीमा देशमुख,प्रा.प्रतिभा कवडे,
प्रा.जयश्री महानोर, प्रा.बाळासाहेब गुंजाळ,प्रा.गभाले,प्रा.अमोल दुसाने,प्रा.नानासाहेब जगताप प्रा.अमोल दातीर प्रा.वैभव देशमुख यांनी प्रयत्न केले. बी.एस.टी.महाविद्यालय आणि भाऊसाहेब गुंजाळ पाटील सह्याद्री ज्युनिअर कॉलेजचे सर्व शिक्षक,शिक्षकेतर कर्मचारी वृंद यांच्या सह विद्यार्थी मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.
Tags

Post a Comment

0Comments

Post a Comment (0)

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!