चंद्रपूर (सिटी लाईन न्यूज नेटवर्क) चंद्रपूर जिल्ह्यातील ब्रम्हपूरी तालुक्यातील नांदगाव येथे १२ एप्रिल रोजी घडलेल्या दुर्दैवी घटनेत बिबट्याच्या हल्ल्यात देवेंद्र पिलारे (३७), प्रफुल सहारे (२७) आणि ओनम सोंदरकर (१८) हे तिघेजण गंभीर जखमी झाले.सध्या सर्वजण ब्रम्हपूरी येथील शासकीय उपजिल्हा रुग्णालयात उपचार घेत असुन विजय वडेट्टीवार यांनी जखमीची भेट घेऊन आरोग्याची विचारपूस केली.
घटना घडलेल्या भागात बिबट्याचा बंदोबस्त करण्याच्या सूचना वनविभागाला दिलेल्या आहे तसेच वैद्यकीय अधिकाऱ्यांना रुग्णांना त्वरित आणि योग्य उपचार देण्याचे निर्देश दिले.या भेटीदरम्यान इतर रुग्णांचीही भेट घेऊन रुग्णालयातील सुविधा, उपचारांची गुणवत्ता याबाबत सविस्तर माहिती घेतली.
या दौर्यात डॉ. प्रितम खंडाळे, डॉ. श्रीकांत कामडी, डॉ. देविदास जगनाडे, खेमराज तिडके, डॉ. राजेश कांबळे, प्रमोद चिमुरकर, हितेंद्र राऊत, डॉ. नितीन उराडे, अमित कन्नाके आणि काँग्रेसचे इतर पदाधिकारी उपस्थित होते.
