श्रीरामपूर(दिपक कदम) भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार आणि देशातील महान नेते डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती आम आदमी पार्टीच्या वतीने मोठ्या आनंद उत्सवामध्ये साजरी करण्यात आली यावेळी आप'चे तिलक डुंगरवाल म्हणाले की बाबासाहेबांनी आपले संपूर्ण आयुष्य भारतातील सर्वसामान्य जनतेसाठी तसेच मागासवर्गीय, दलित,गरीब यांच्या उन्नतीसाठी खर्ची केले.
डॉ.बाबासाहेब आंबेडकर एक प्रख्यात अर्थशास्त्रज्ञ, न्यायशास्त्रज्ञ आणि राजकारणी होते.त्यांनी केवळ सामाजिक न्याय आणि सामाजिक विषमतेविरुद्धच लढा दिला नाही तर महिला सक्षमीकरणासाठीही बाबासाहेबांनी खूप काम केले.बाबासाहेबांनी महिलांचे समान हक्क,लोकसंख्या नियंत्रण,समान नागरी संहिता आणि मूलभूत जबाबदाऱ्या याविषयीही लोकांना जागृत केले.
बाबासाहेब म्हणायचे की, ‘मी स्त्रियांची प्रगती ज्या प्रमाणात झाली असेल त्यावरून एखाद देशाच्या प्रगतीचा अंदाज बांधता येतो.त्यांच्या या विचारांमुळे ते आज ते कोट्यवधी भारतीयांसाठी प्रेरणास्त्रोत आहेत.बाबासाहेबांच्या जयंतीनिमित्त संपूर्ण देश त्यांचे स्मरण करत आहे.
देशाच्या या महान व्यक्तिमत्वाला विनम्र अभिवादन. करताना आम्हाला मनस्वी आनंद होत आहे.यावेळी समर्थ ग्रुप सर्व पदाधिकारी तसेच तिलक डुंगरवाल,तालुकाध्यक्ष विकास डेंगळे, राहुल रणपिसे ,भरत डेंगळे भैरव मोरे ,डॉक्टर प्रवीण राठोड, अभय गोसावी,प्रदीप उंडे,सलीम भाई शेख,राहुल लुक्कड,अमोल नवगिरे,प्रशांत बागुल,कुणाल लटमळे,श्रीधर कराळे मनोज गाडे,संतोष वैष्णव,मनोज शिंदे महेश कवठाळे ,मोहन तेलोरे महेश रासकर
मनोज बोंबले,देवराज मुळे आधी आम आदमी पार्टी व समर्थ ग्रुप चे कार्यकर्ते उपस्थित होते.
