संगमनेर (दिपक कदम) येथील भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर प्रतिष्ठान, यांच्या वतीने डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३४ व्या जयंतीनिमित्त अभिवादन सभेचे आयोजन करण्यात आले होते.
जयंती कार्यक्रमाला मा. मंत्री लोकनेते बाळासाहेब थोरात,.डाॅ.सुधीर तांबे व आमदार सत्यजित तांबे यांनी उपस्थित राहून विश्वरत्न डॉ. आंबेडकरांना अभिवादन केले. तसेच,बहुजन शिक्षण संघाचे अध्यक्ष व माजी प्राचार्य बी.आर. कदम यांना त्यांच्या शैक्षणिक व सामाजिक कार्याबद्दल जीवनगौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
प्रसंगी बोलताना बाळासाहेब थोरात म्हणाले, डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेल्या संविधानाचे रक्षण करणे आणि त्यांच्या विचारांचा अंगीकार करणे ही आपली सामूहिक जबाबदारी आहे.
यावेळी मंचावर सौ.दुर्गा तांबे, डाॅ.जयश्री थोरात, उत्कर्षी रूपवते,हिरालाल पगडाल , श्रीरंग तलवारे ,गणपत सांगळे, सुधाकर रोहम, व्याख्याते प्रा. राहुल हांडे आदिंसह प्रतिष्ठानचे विविध पदाधिकाऱ्यांसह मान्यवर उपस्थित होते.
