श्रीरामपूर दिपक कदम सर्व जगामध्ये आपण सर्वात भाग्यवान आहोत कारण जगातील सर्वात पवित्र आणि न्याय देणारी लोकशाही आपल्या भारतात अस्तित्वात आहे आणि ती लोकशाही अस्तित्वात असण्यासाठी ज्यांनी आपले सर्व जीवन समर्मित केले असे महामानव भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर होय असे प्रतिपादन डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३४ व्या जयंती निमित्ताने शिवसेनेचे जिल्हाप्रमुख सचिन बडदे यांनी केले.
श्रीरामपूर येथे शिवसेनेतर्फे भीम जयंती निमित्ताने डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन करण्यात आले सचिन बडदे बोलत होते.
यावेळी भाजपाचे ज्येष्ठ नेते दिपक पटारे,आम आदमी पार्टीचे तिलक डुंगरवाल, महेंद्र त्रिभुवन ,रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे सुभाष त्रिभुवन ,वाहतूक सेनेचे यासीन सय्यद, शहर सचिव राहुल रणधीर ,विकास डेंगळे, शिवअंगणवाडी जिल्हाप्रमुख शारदा कदम .निर्मला शिंदे , ज्योती सपकाळ ,अनुराधा आहेर ,लता गूढधे ,उमेश आल्हाट,आशिष त्रिभुवन,राहुल रणपिसे,भैरव मोरे आदी मोठ्या संख्येने उपस्थित होते
