शिर्डी (दिपक कदम) येथील नगरपरीषदेच्या वतीने कार्यान्वित करण्यात आलेल्या सांडपाणी प्रक्रीया केंद्राचे उद्घाटन डॉ.सुजय विखे पा. यांच्या उपस्थितीत नुकतेच करण्यात आले.
प्रसंगी सभापती ज्ञानेश्वर गोंदकर माजी नगराध्यक्ष अभय शेळके.सौ.अनिता जगताप यांच्यासह मान्यवर उपस्थित होते.
या प्रकल्पामुळे नदीपात्रात सोडण्यात येणारे पाणी पूर्णपणे बंद होवून नदीचे प्रदूषण पूर्णता थांबविण्यात यश येईल. जलसंपदा विभागाने सध्या जल व्यवस्थापन कृती पंधरवडा सुरू केला आहे.या पार्श्वभूमीवर शिर्डी नगरपरीषदेने सुरू केलेल्या प्रकल्पाबद्दल पालिका प्रशासनाचे कौतुक होत आहे.
