आठ फुटांचा फाऊंटन पेन विद्यार्थ्यांना प्रेरणा देणारा ठरेल : खासदार डॉ. शोभा बच्छाव
नाशिक (दिनकर गायकवाड) नाशिक शहर जिल्हा काँग्रेस कार्यालयाच्या आवारात यावर्षी ऐतिहासिक असा देखावा डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सव समिती २०२५ चे अध्यक्ष डॉ. वसंत ठाकूर यांच्या संकल्पनेतून सादर करण्यात आला.
हा पेनचा देखावा विद्यार्थ्यांना प्रेरणादायक ठरेल,असा विश्वास या देखाव्याच्या उद्घाटनाप्रसंगी बोलताना खा. डॉ. शोभा बच्छाव यांनी व्यक्त केला.
या देखाव्याचे विश्वविक्रमी रेकॉर्ड गोल्डन बुक ऑफ रेकॉर्डमध्ये व इंडिया बुक ऑफ रेकॉर्डमध्ये याची नोंद झाली आहे.भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी भारत देशाचा संविधान ज्या पेनने लिखित केले, त्याच पेनची प्रतिकृती हुबेहूब आठ फूट उंच अशी बनविण्यात आली होती. त्या प्रतिकृतीचे व डॉ.बाबासाहेब आंबेडकरांचे पूजन खा.डॉ. शोभा बच्छाव नाशिक शहर काँग्रेसचे अध्यक्ष आकाश छाजेड,ज्येष्ठ नेते शाहू खैरे उत्सव समितीचे अध्यक्ष डॉ. वसंत ठाकूर यांच्या हस्ते करण्यात आले.समस्त जगाला अभिमान वाटणारे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पेनाची प्रतिकृती येणाऱ्या काळातील युवकांना विद्यार्थ्यांना मार्गदर्शक ठरेल,असे मत खा. डॉ. शोभा बच्छाव यांनी व्यक्त केला.ही प्रतिकृती नाशिक शहरात जिल्ह्यात विद्यार्थ्यांना व ग्रामीण भागातील खेडोपाडी ही प्रतिकृती नेऊन तेथील विद्यार्थ्यांना युवकांना या आदर्श महापुरुषाच्या पेनचे दर्शन घडविले जाणार आहे,अशी माहिती शहराध्यक्ष आकाश छाजेड व डॉ. वसंत ठाकूर यांनी दिली.
याप्रसंगी माजी नगरसेविका वत्सला खैरे, लक्ष्मण धोत्रे, महिला काँग्रेसच्या अध्यक्षा स्वाती जाधव, बाळासाहेब गामणे, बबलू खैरे, हनिफ बशीर, उद्धव पवार, विजय पाटील, अल्तमश शेख, संदीप शर्मा, प्रा. भालचंद्र पाटील, राजकुमार जेफ, जगदीश वर्मा, रोहन कातकडे, जगदीश बोडके, जावेद इब्राहिम, ॲड.अरुण दोंदे, राजू अवतडे, राहुल पगार, धोंडीराम बोडके, माया काळे, कुसुमताई चव्हाण, उषा साळवे, हर्षल पवार,जावेद पठाण, गौरव सोनार, शहाबाज मिर्झा, प्रा. प्रकाश खळे, दिनेश उन्हवणे, सचिन भुजबळ, अनिल बहोत, फारुक मन्सुरी, अनिल बेग, देवेन मारू, प्रकाश माळी, रोहित वाघ, संतोष हिवाळे, स्वरूप पिसे, अॅड. नंदकुमार सूर्यवंशी, सिद्धार्थ गांगुर्डे, संदीप वाघ, उमेश चव्हाण आदी मान्यवर उपस्थित होते.
