संगमनेर तालुक्यातील सर्व चर्चेस मध्ये ईस्टर संडे उत्साहात साजरा
संगमनेर-दिपक कदम प्रभू येशूला गुड फ्रायडे या दिवशी क्रुसावर खिळविले आणि तिसऱ्या दिवशी रविवारी ते मरणातून उठले या दिवसाची आठवण ठेवून आज सामाजिक परिस्थितीतील सर्व समस्यावर मात करावयाची असेल तर खऱ्या अर्थाने आपण एकमेकांचा आधार बनायला हवे असे प्रतिपादन सेंट मेरी चर्चचे प्रमुख धर्मगुरू फा. ज्यो.गायकवाड यांनी केले.
फा. ज्यो. गायकवाड पुढे म्हणाले, ईस्टर संडे हा नाताळ सणाप्रमाणेच जगभर मोठ्या उत्साहात साजरा केला जातो तसेच आज धकाधकीच्या जीवनामध्ये सर्वसामान्य माणूस होरपळून निघत आहे हताश झालेल्या गोरगरीब जनतेच्या समस्यावर मात करायची असेल तर आपणही एकमेकांना मदतीचा हात द्यायला हवा.
सेंट मेरी चर्चेचे प्रमुख धर्मगुरू फा.ज्यो.गायकवाड, फा. जयसिंग, ज्ञानमाता विद्यालयाचे प्राचार्य फा.फ्रान्सिस पटेकर, फा. प्रशांत शहाराव, संत ईगनाथी चर्चेचे फा. विल्सन परेरा, मेथोडिस्ट चर्चेचे सतीश मिरजकर, पास्टर फेलोशिपचे अध्यक्ष पा.शिवाजी लांडगे,बिलिव्हर्स चर्चेचे पा.ग्रेगरी केदारी, दिपक शेळके आदींनी आपापल्या चर्चेस मध्ये ईस्टर निमित्त सामाजिक संदेश दिला तर यावेळी माजी महसूल मंत्री बाळासाहेब थोरात, डॉ.सुधीर तांबे, आ. सत्यजित तांबे, डॉ.जयश्री थोरात, दुर्गा तांबे यांनी ही ईस्टर निमित्त ख्रिस्ती बांधवांना शुभेच्छा दिल्या
यावेळी प्रभाकर दुशिंग, सुहास गायकवाड, लाजारस केदारी, ख्रिस्ती विकास परिषदेचे अध्यक्ष अनिल भोसले, सुखदेव शेळके, अँड. विजयानंद पगारे, शशी पगारे, प्रा. बाबा खरात, तेरेजा सोनवणे, संगीता बारसे, सुरेखा रोहम, श्रीधर भोसले, आशिष शेळके,अँड. रवी शेळके आदींसह मोठ्या संख्येने भाविक उपस्थित होते.
