खोपडी येथे उधळपट्टीला लगाम लावत समाजापुढे आदर्श उभा करणारा मंगल परिणय उत्साहात
संगमनेर नितीनचंद्र भालेराव
कोपरगाव तालुक्यातील खोपडी येथे अनिल भागीनाथ त्रिभूवन यांची कन्या प्रणिता त्रिभूवन हिला पाहाण्यास हिवरगाव पावसा येथील भिमाशंकर रमाजी भालेराव यांचे चिरंजीव अमोल भालेराव यांना मुलगी बघण्यासाठी खोपडी येथे गेले.हिवरगाव पावसा येथील भालेराव कुटुंबातील व नातेवाईक मंडळी मुलीच्या घरी मुलगी बघण्यासाठी गेले. मुला-मुलीची पसंती झाली.
पसंतीचा कार्यक्रम उरकल्यानंतर दोन्ही कुटुंबीय विवाहासाठी तयार झाली.साक्षगंध विधी करण्याचे ठरवले,पण खर्चात पडून विनाकारण बडेजाव मिरवत आर्थिक नुकसान करण्यापेक्षा दोन्ही बाजूने मनाचा मोठेपणा दाखवत लगेच विवाह उरकून घेऊ असा प्रस्ताव पुढे आला.
त्यानंतर उभयतांनी सारासार विचार करून इतर होणाऱ्या अवास्तव खर्चास फाटा देवून बौद्ध पद्धीतीने साक्षागंध विधी मध्ये मंगल परिणय सोहळा पार पडला आणि नव वधूस आनंदाने सासरी घेवून गेले.घडलेला मंगल परिणय समाजापुढे आदर्श उभा करणारा असून उधळपट्टीला लगाम लावणारा आहे.
या कामी देवगड विद्यालयाचे माजी प्राचार्य दशरथ विश्राम भालेराव,अशोक भालेराव, हरिचंद्र भालेराव,रविंद्र भालेराव,शरद भालेराव,चंद्रकात भालेराव,माजी मुख्याध्यापिका जि.प.शाळा मंदाकिनी दशरथ भालेराव व मुलाचे मामा संदिप नाना गायकवाड आणि मनोज विजय गायकवाड आदींनी पुढाकार घेत परिणय सोहळा मोठ्या उत्साहात साजरा झाला.
