संगमनेर नितीनचंद्र भालेराव
संगमनेर तालुक्यातील हिवरगाव पावसा येथे सप्तश्रृंगी माता मंदिरात मुर्ती प्राणप्रतिष्ठा व कलशरोहन सोहळा मोठ्या उत्साहात संपन्न झाला.तीन दिवसीय भव्य स्वरूपाचे धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते.
रविवार दि. २० एप्रिल रोजी सकाळी ८ ते १० वाजेपर्यंत हिवरगाव पावसा फाटा ते ग्राम प्रदक्षिणा मुर्तीची सवाद्य भव्य मिरवणूक व मुर्तीची पुजा व यज्ञ सोहळा पार पडला सोमवार दि. २१ एप्रिल रोजी सकाळी ८.०० वा. देवता हवन मुर्ती प्राणप्रतिष्ठा व पुजा आरती झाली.मंगळवार दि. २२ एप्रिल रोजी सकाळी ९.१५ वा कलशारोहन सोहळा श्री.संत परमपूज्य गुरुवर्य श्री.स्वामी रामानंद गिरी महाराज यांच्या हस्ते झाला.
तसेच सकाळी १० ते १२ वाजता ह.भ.प.चंद्रकांत महाराज खळेकर (राहुरी) यांचे किर्तनाच कार्यक्रम झाल्यानंतर हिवरगाव पावसा व पंचक्रोशीतील भाविकांसाठी महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते.सालाबाद प्रमाणे सायं. ८.०० वा मिरवणूक व गोंधळाचा कार्यक्रम संपन्न झाला.
कार्यक्रम यशस्वीरित्या संपन्न करण्यासाठी सप्तश्रृंगी तरुण मित्र मंडळ,समस्त ग्रामस्थ, हिवरगाव पावसा व पंचक्रोशी यांनी प्रयत्न केले.