पुणे दिपक कदम पुणे येथे झालेल्या 'तिसऱ्या राष्ट्रीय सहवीजनिर्मिती पुरस्कार वितरण समारंभा'त कोपरगाव येथील विवेक कोल्हे सहभागी झाले होते.
राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे अध्यक्ष व कोजनरेशन संस्थेचे अध्यक्ष खासदार शरद पवार यांच्या उपस्थितीत हा सोहळा पार पडला झाला.
कार्यक्रमास राज्याचे सहकार मंत्री बाबासाहेब पाटील, नॅशनल को-ऑपरेटिव्ह शुगर फॅक्टरी फेडरेशनचे अध्यक्ष. हर्षवर्धन पाटील, सकाळ उद्योग समूहाचे प्रमुख प्रतापराव पवार, केंद्रीय सल्लागार डॉ. संगीता कस्तूरे, कोजनरेशन असोसिएशनचे उपाध्यक्ष जयप्रकाश दांडेगांवक पी. आर. पाटील, बी. बी. ठोंबरे, साखर आयुक्त सिध्दाराम सालिमठ, दिनेश जगदाळे आणि नरेंद्र मोहन यांसह अनेक मान्यवर उपस्थित होते.
सहवीजनिर्मिती क्षेत्रात भारताला स्वावलंबी बनवण्यासाठी आपण सर्वांनी एकत्रितपणे प्रयत्न करूया असा सुर यावेळी निघाला.
