पास्काचा सण म्हणजे ईस्टर श्रीरामपूरात साजरा

Cityline Media
0
श्रीरामपूर (दिपक कदम) शहरातील लोयाला सदन चर्चचे प्रमुख धर्मगुरू रे.फा.प्रकाश भालेराव आणि लोयोला दिव्यवाणी चर्चचे प्रमुख धर्मगुरु रे.फा.अनिल चक्रनारायण यांनी सर्वप्रथम संत लुक हॉस्पीटलच्या प्रांगणात अग्नीला आशिर्वाद दिला. त्याठिकाणाहून अग्नी आशिर्वादातून मेणबत्ती लावून सर्व धर्मगुरु, सिस्टर्स, महिला मंडळ,पुरुष मंडळी यासह सर्व भाविकांनी मिरवणूकीत सहभाग घेऊन मिरवणूकीने संत झेवियर इंग्लिश स्कूल पर्यंत आले.
लोयोला दिव्यवाणीचे प्रमुख धर्मगुरू रे.फा.अनिल चक्रनारायण यांनी मिस्सा अर्पण करून आपल्या प्रवचनात म्हटले की, कल्पना करा, संपूर्ण निसर्गाची उलथापालथ करून आपल्या तारणांसाठी ह्या सर्व गोष्टी परमेश्वराने केल्या आहेत. आपल्या पापासाठी सर्व काही पणाला लावले आहेत.मनुष्य प्राण्याचे जीवन सुखी व्हावे म्हणून त्यांने सर्व गोष्टी केल्या.
 त्यामध्ये आकाश, चंद्र, तारे निर्माण केले. 

जलाशय निर्माण केले. डोंगर, समुद्र एवढेच नाहीतर ज्याला मनुष्य घाबरतो असे श्वापद, हिंस्त्र प्राणी निर्माण केले.आणि मग मानवाला निर्माण केले आणि सांगितले आणि म्हटले फलद्रुव हो..! हे सर्व कोणासाठी निर्माण केले? परमेश्वर एवढा हळवा असू शकतो का? कि त्यांने आपल्यासाठी एकलुता एक पुत्राला देखील क्रुसावर चढविले. मानवाला प्रकाश म्हणून माझ्यासाठी हळवा होवू शकतो याद्वारे आमच्यावर परमेश्वराचे प्रेम किती आहे हे समजते देव आपल्या पुत्राला समर्पित करण्यास घाबरत नाही हे सर्व आपल्या पापासाठी करतो हा विचार आम्ही आमच्या अंतकरणात खोल रुजवून घरी घेवू जावू या.त्यांनी परमेश्वराने   देवाचे आभार मानताना आपल्या सर्व ,नसानसातून,संपूर्ण तनमन धनाने देवाचे आभार मानत जावे. तसेच प्रवचनानंतर बाप्तिस्मा विधी करून परमेश्वराने निर्माण केलेल्या पाण्याला आशिर्वाद दिला तद्नंतर मिस्साला सुरुवात केली.यावेळी लोयोला सदन चर्चचे प्रमुख धर्मगुरू रे.फा.प्रकाश भालेराव,सेंट झेविअर इग्लिंश मेडीयमचे प्राचार्य रे.फा.विक्रम शिनगारे, सहाय्यक धर्मगुरु रे.फा.जेकब गायकवाड या सर्वांना पास्काचा सणाचा अर्थात जागरण विधी मिस्सा केला.

      यावेळी संत लुक हॉस्पिटलच्या सिस्टर्स,कनोसा होस्टेल येथील सर्व सिस्टर्स व मुली यासह श्रीरामपूर शहरातील सर्व ख्रिस्ती भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
Tags

Post a Comment

0Comments

Post a Comment (0)

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!