डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंती निमित्ताने खळीत ‌सर्व रोग निदान शिबिराचे आयोजन

Cityline Media
0
आश्वी (प्रतिनिधी) संगमनेर तालुक्यातील खळी येथे भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३४ व्या जयंती निमित्त खळी येथे जयंती उत्सव समिती वतीने विविध कार्यक्रम तसेच सर्व रोग निदान शिबिराचे आयोजन केले असल्याची माहिती जयंती संयोजन समितीचे अध्यक्ष किशोर  वाघमारे यांनी दिली 
यावेळी सोमवार दिनांक १४ एप्रिल रोजी सकाळी आठ वाजता खळी गावातील भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक येथे प्रतिमेचे पूजन आश्वी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक संजय सोनवणे यांच्या हस्ते होणार असून सकाळी नऊ वाजता महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध मेडिकल हॉस्पिटल सर्व रोग निदान शिबिर आयोजित केले आहे.

या शिबिराचे उद्घाटन प्राथमिक आरोग्य केंद्र अशी खुर्द ते वैद्यकीय अधीक्षक डॉ. महेश काकड पर्यवेक्षक श्री. झरेकर व खळी येथील उपकेंद्राचे सामुदायिक आरोग्य अधिकारी डॉ. रोकडे परिचारिका श्रीमती महांकाळे आदी मान्यवरांच्या शुभहस्ते शिबिराचे उद्घाटन करणार आहे.

 सायंकाळी पाच वाजता भव्य दिव्य मिरवणुकीचे आयोजन केले आहे यावेळी फटाक्याच्या आतिश बाजी होऊन रात्री आठ वाजता अभिवादन सभेचे आयोजन केले आहे याप्रसंगी प्रसिद्ध व्याख्याते प्राध्यापक अरुण ब्राह्मणे भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवन चरित्रावर व्याख्यान देणारा आहे.

यावेळी संयोजन समितीच्या वतीने गुणवंत विद्यार्थ्यांचा सन्मान भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर समाज भूषण पुरस्कार वितरण सोहळा गावातील मान्यवरांचा सन्मान आयोजित केला आहे यानंतर स्नेहभोजनाचा कार्यक्रम आयोजित केला आहे 

सदर कार्यक्रमासाठी गावचे सरपंच विलास वाघमारे जनसेवाचे नेते सुरेश भाऊ नागरे संघाचे उपाध्यक्ष राजेंद्र चकोर प्राध्यापक रमेश सानप पोलीस पाटील मच्छिंद्र चकोर सेवा सोसायटीचे अध्यक्ष सोन्याबापू लबडे भोलेनाथ दूध संस्थेचे अध्यक्ष साहेबराव पाटील तांबे सेवा सोसायटीचे व उपाध्यक्ष कांगणे ग्रामपंचायत सदस्य सचिन आव्हाड सोमनाथ नागरे तंटामुक्ती अध्यक्ष भाऊसाहेब लहानु नागरे  सानप सर जिल्हा परिषद प्राथमिक शाळेचे मुख्याध्यापक दत्तात्रय जिल्हा परिषद प्राथमिक शाळेचे मुख्याध्यापक श्री.हजारे करवाडी जिल्हा परिषद प्राथमिक शाळेचे मुख्याध्यापक श्रीराम दातीर कांगणवाडी प्राथमिक शाळेचे मुख्याध्यापक श्री सानप आधी प्रमुख मान्यवर सदर कार्यक्रमासाठी मोठ्या संख्येने उपस्थित राहणार आहे 

या भीम जयंती सोहळा जास्तीत जास्त संख्येने उपस्थित रहावे असे आवाहन बाळासाहेब भिकाजी वाघमारे दादासाहेब वाघमारे प्राध्यापक बाळासाहेब वाघमारे साईबाबा वाघमारे शंकर वाघमारे शिवाजी वाघमारे संतोष वाघमारे सुरेश वाघमारे सुयश वाघमारे प्रमोद वाघमारे गणेश वाघमारे योगेश वाघमारे दत्तात्रय वाघमारे आधी प्रमुख जयंती समितीच्या पदाधिकाऱ्यांनी जास्तीत जास्त संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन केले आहे.
Tags

Post a Comment

0Comments

Post a Comment (0)

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!