मनमाड शहर आणि खर्डेत श्रीराम जन्मोत्सव उत्सव साजरा

Cityline Media
0


मनमाड (दिनकर गायकवाड)
डौलाने फडकणारे भगवे ध्वज, अश्वपथक,सियावर रामचंद्र की जयचा जयघोष, मर्यादा पुरुषोत्तम श्रीरामाचा आकर्षक चित्ररथ,श्रीराम जन्मोत्सवा निमित्त शहरातून काढण्यात आलेल्या मिरवणुकीत प्रभू श्रीरामाची १२ फूट मूर्ती आणि उत्साहात सहभागी झालेले रामभक्त,अशा भव्य स्वरूपात शहरात श्रीराम नवमी निमित श्रीराम जनमोत्सव समितीच्या वतीने श्रीराम रथयात्रा काढण्यात आली. यंदाचा श्रीराम जन्मोत्सव जल्लोषात आणि उत्साहात साजरा करण्यात आला.
शहरातील श्रीराम मंदिरासह सर्व मंदिरात श्रीराम जन्मोत्सव उत्साहात आणि पारंपरिक पद्धतीने साजरा करण्यात आला. श्रीराम जन्मोत्सव समिती व ओम मित्रमंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने यंदा श्रीराम नवमी उत्सवाचे ३९ वे वर्ष होते. समितीचे पदाधिकारी आणि मान्यवरांच्या हस्ते रथाची पूजा करण्यात येऊन श्रीफळ
वाढविण्यात येऊन रथयात्रेचा शुभारंभ झाला.

ध्वजधारी युवक, वाद्यवृंद पथक, सुशोभित चित्ररथात श्री रामाची प्रतिमा असे श्रीराम रथयात्रेचे भव्य स्वरूप होते. सियावर रामचंद्र की जय, पवनपुत्र हनुमान की जय, हर हर महादेव अशा गगनभेदी घोषणांनी हजारो रामभक्त श्रीराम जन्मोत्सव समितीचे कार्यकर्ते,हिंदुत्ववादी संस्था संघटनांचे पदाधिकारी, श्रीराम भक्त नागरिक, विविध राजकिय पक्षांचे प्रतिनिधी या भव्य रथयात्रेत सहभागी झाले होते.तत्पूर्वी सकाळी आठवडे बाजारातील श्रीराम मंदिरात सकाळी श्रीरामाची अभिषेक पूजा करण्यात आली. दुपारी भजनाचा कार्यक्रम होऊन श्रीराम जन्मोत्सव साजरा करण्यात आला.

आरती होऊन भाविकांना प्रसादाचे वाटप करण्यात आले. विठ्ठल बालाजी मंदिर,श्रीकृष्ण मंदिर,बालाजी मंदिर,साईबाबा मंदिर, श्री गजानन महाराज मंदिर, आठवडे बाजारातील श्री बालाजी मंदिर आदी सर्व मंदिरांत श्रीराम जन्मोत्सवा निमित्त भरगच्च धार्मिक कार्यक्रम झाले.

श्रीरामाच्या दर्शनासाठी शहरातील सर्वच मंदिरे रामभक्तांच्या गर्दीने फुलून गेली. ठिकठिकाणी प्रसाद वाटप करण्यात आले. श्रीराम जन्मोत्सव समितीचे पदाधिकारी, सदस्य आणि विविध राजकीय पक्ष संघटनांचे कार्यकर्ते आणि श्रीराम भक्त नागरिक मोठ्या संख्येने या राम रथयात्रेत सहभागी झाले होते.

तसेच खर्डे येथे देखील श्रीराम जन्मोत्सव साजरा करण्यात आला खर्डे येथे श्रीराम जन्मोत्सव कार्यक्रम मोठ्या उत्साहात साजरा झाला.दुपारी चार वाजता रथाचा लिलाव होऊन सायंकाळी पाच वाजता रथ मिरवणुकीचा मान माधव ठोंबरे यांना देण्यात आला. टाळ मृदंगाच्या जयघोषात व आदिवासी नृत्याने संपूर्ण गावातून मिरवणूक काढण्यात आली.

खर्डे ग्रामस्थांचे ग्रामदैवत असलेल्या प्रभू श्रीराम यांच्या जन्मोत्सवाच्या निमित्ताने गावात यात्रेचे आयोजन करण्यात येते. गेल्या सात दिवसांपासून रामनवमी च्या पार्श्वभूमीवर श्रीराम मंदिरात पारायण सोहळा, संगीत रामायण कथा पार पाडली. शिवव्याख्याते प्रा. यशवंत गोसावी याचे व्याख्यान आयोजित करण्यात आले होते. ह. भ. प. रमाकांत महाराज डोखळे, खेडगावकर यांच्या कीर्तनाने राम जन्मोत्सव सोहळा मोठ्या उत्साहात पार पडला.
Tags

Post a Comment

0Comments

Post a Comment (0)

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!