कणगरच्या लिंगपिसाटाने केला पुतणीवर लैंगिक अत्याचार

Cityline Media
0
राहुरी (प्रतिनिधी) नातेसंबंधाना काळीमा फासणारी घटना राहुरी तालुक्यातील कणगर येथे नुकतीच घडली कणगर येथील एका घरात एकटीच असलेल्या २२ वर्षीय अपंग युवतीवर लैंगिक अत्याचार केल्याची खळबळजनक घटना घडली असून याप्रकरणी राहुरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.अपंग युवतीवर झालेल्या अत्याचाराच्या घटनेने सर्वत्र संताप व्यक्त होत आहे.
याबाबत पीडित मुलीच्या चुलतीने राहुरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.पीडित २२ वर्षीय अपंग व मतिमंद मुलगी ही १५ एप्रिल रोजी दुपारी १ वाजेच्या दरम्यान घरात एकटी असताना येथील नराधम अजय संजय दिवे,राहणार कणगर,तालुका राहुरी याने अपंग मतिमंद असल्याचा फायदा घेऊन तिच्या घरात घुसून दरवाजा बंद करून शारीरिक अत्याचार केला.

दरम्यान पिडित अपंग मुलीने सदरचा धक्कादायक प्रकार हा तिच्या चुलतीला सांगितला असता तिने राहुरी पोलिस ठाण्यात धाव घेऊन याबाबत फिर्याद दिली आहे.पोलिसानी आरोपी विरोधात भारतीय न्याय संहिता ७४,७६.६४ (२)(आय) (के) ३३३ अधिनियम १६ चे कलम ९२ नुसार गुन्हा दाखल केला आहे

सदर फिर्यादीवरून अजय संजय दिवे (रा. कणगर, ता. राहुरी) याच्यावर गुन्हा दाखल केल्याने खळबळ उडाली आहे

या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस निरीक्षक संजय ठेंगे यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलिस उपनिरीक्षक अमोल पवार हे करीत आहे.

अपंग असल्याचा फायदा घेऊन युवतीवर भरदिवसा अत्याचार केल्याने विविध सामाजिक संघटनांनी या घटनेबद्दल संताप व्यक्त करून लिंगपिसाटास कठोर शिक्षा करण्याची मागणी केली आहे 
Tags

Post a Comment

0Comments

Post a Comment (0)

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!