श्रीरामपूर दिपक कदम भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३४ व्या जयंतीनिमित्त प्रत्येक वर्षी दिला जाणारा मानाचा श्रीरामपूर येथुन भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर समाजभूषण पुरस्कार भीमा कोरेगाव विजयस्तंभ स्मारक समितीचे अध्यक्ष राहुल डंबाळे यांना तर त्यागमूर्ती माता रमाई समाजभूषण पुरस्काराने वंचित बहुजन आघाडीच्या राज्य प्रवक्त्या उत्कर्षा रुपवते यांना भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सव एकता समितीचे अध्यक्ष सुभाष त्रिभुवन तसेच मा.शिक्षण उपसंचालक रामचंद्र जाधव तसेच प्रमुख मान्यवरांच्या हस्ते पुष्पगुच्छ फेटा बांधून तसेच सन्मानचिन्ह देऊन सन्मानित करण्यात आले.
येथील रेल्वे ठाण्या समोरील डॉ बाबासाहेब आंबेडकर स्मारकाजवळ भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सव एकता समिती तसेच भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर पूर्णाकृती पुतळा स्मारक समिती च्या संयुक्त विद्यमाने डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३४ व्या जयंतीनिमित्त शुक्रवार दिनांक १८ एप्रिल रोजी सायंकाळी ७:०० वाजता मुंबई येथील महाराष्ट्रभर गाजत असलेल्या नितीश कुमार नरेश कुमार प्रस्तुत भीम सूर्य क्रांतीचा समाज प्रबोधन पर भीम गीतांचा कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
प्रसंगी समाजामध्ये उल्लेखनीय काम करणारे भीमा कोरेगाव विजयस्तंभ स्मारक समितीचे अध्यक्ष राहुल डंबाळे तसेच वंचित बहुजन आघाडी राज्य प्रवक्त्या उत्कर्षाताई रुपवते यांना या कार्यक्रमात पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले.
यावेळी चरण त्रिभुवन सुमेध पडवळ संघराज त्रिभुवन बाळासाहेब बागुल हनीफ पठाण सुनील मगर अंबादास निकाळजे बाबासाहेब पवार अर्जुन शेजवळ शिवा साठे पी.एस.निकम रवींद्र गायकवाड किशोर ठोकळ रॉकी लोंढे रज्जाक पठाण एजाज पठाण राकेश थोरात भारत त्रिभुवन वसंत साळवे सतीश त्रिभुवन मिलिंद धीवर सुरेश शेळके अशोक दिवे संतोष त्रिभुवन तसेच महिला आघाडीच्या सुशीला त्रिभुवन ॲड सोनाली त्रिभुवन कांताबाई जाधव आशाबाई रुद्राक्ष बुद्धप्रिया त्रिभुवन संगीता गायकवाड प्राजक्ता त्रिभुवन तसेच मुंबई येथील शाहीर नितीन बनसोडे नरेश बडेकर पल्लवी खरात पूनम कदम यांनी आपल्या सुरेल आवाजात भीमगीते सादर करून भीम अनुयायांची मने जिंकली.
