मुंबई (दिपक कदम जलसंपदा विभागाच्या वतीने सुरू करण्यात आलेल्या जल व्यवस्थापन कृती पंधरवडा २०२५ या राज्यस्तरीय उपक्रमाचा शुभारंभ मुख्यमंत्री.देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री मा एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार आणि मंत्री मंडळातील सर्व सहकार्याच्या उपस्थितीत नुकताच झाला.
विश्वनेते पंतप्रधान आदरणीय नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतील नदीजोड प्रकल्पाची अमंलबजावणी तसेच महायुती सरकारने दुष्काळमुक्त महाराष्ट्राच्या केलेल्या संकल्पाची पायाभरणी या उपक्रमातून निश्चित होईल असा विश्वास वाटतो.
या उपक्रमात विभागाच्या माध्यमातून पाण्याचे संवर्धन संरक्षण आणि प्रदूषण मुक्त करण्याचा संकल्प करण्यात आला असून,कालव्याची दुरुस्ती तसेच शेतकऱ्यांच्या समस्यांचे निराकरण करण्यासाठी जलसंपदा विभाग गावागावात जाणार आहे.नागरीक,युवक महीला यांच्या सहभागाने उपक्रम लोकाभिमुख होईल.
