नाशिक (दिनकर गायकवाड)
नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीच्या पहिल्या महिला सभापतीपदी कल्पना चुंभळे यांची निवड झाल्याबद्दल त्यांचा नागरी सत्कार सोहळा नुकताच येथे पार पडला.
विल्होळी ग्रुप विविध कार्यकारी सहकारी विकास सेवा संस्थेच्या संचालिका माजी अध्यक्ष तथा माजी नगरसेविका कल्पना चुंभळे यांची नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीच्या ७३ वर्षांनंतर पहिल्या महिला सभापती म्हणून निवड झाली. त्याबद्दल श्री क्षेत्र विल्होळी पंचक्रोशीच्या वतीने गौळाणे,विल्होळी, राजुर बहुला, जातेगाव, तळेगाव,अंजनेरी, पिंपळद या विविध कार्यकारी सहकारी सोसायटी, ग्रामपंचायत विल्होळी सरपंच,उपसरपंच तसेच ग्रामस्थांच्या वतीने नागरी सत्कार सोहळा श्रीकृष्ण गार्डन येथे नुकताच पार पडला
कार्यक्रमाचे अध्यक्ष कृषी उत्पन बाजार समितीचे संचालक शिवाजी चुभळे होते.कृउबाचे उपसभापती विनायक माळेकर, संपत सकाळे, जगन्नाथ कटाळे, तानाजी करंजकर, जगदीश अपसुंदे, युवराज कोठुळे, भास्कर गावित, धनाजी पाटील, चंद्रकांत निकम,राजाराम धनवटे, प्रल्हाद काकड, सविता तुंगार, संदीप पाटील आदी उपस्थित होते.
यावेळी कार्यक्रमाचे आयोजक वाळू नवले यांनी विल्होळीत उपबाजार समितीची मागणी केली.याप्रसंगी विल्होळी सोसायटीचे उपाध्यक्ष दगडू निंबेकर, प्रताप चुंभळे, गणपत नवले, उत्तम थोरात,बाळू भावनाथ, बाळू ढगे, बाळू नरवाडे, संजय घेळ,थोरात, पप्पू धडे, दशरथ ढबळे, भाऊसाहेब
भावनाथ,अमोल चव्हाण, बबनराव गायकवाड, विष्णू घेळ, जानकी चव्हाण, भास्कर थोरात, सुभाष चव्हाण, समाधान चव्हाण, विल्होळी ग्रुप विविध कार्यकारी सहकारी विकास सेवा संस्थेचे पोपट पवार आदींच्या वतीने सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्राचार्य डी. एस.अहिरे यांनी केले. प्रास्ताविक वाळू नवले यांनी केले. आभार प्रदर्शन गणपत नवले यांनी केले.
