समृद्धी महामार्गावरील आमने नोड बीकेसी,नोएडाप्रमाणे विकसित होणार-उपमुख्यमंत्री

Cityline Media
0
मुंबई सिटीलाईन मिडिया नेटवर्क समृद्धी महामार्गावरील आमने नोड बीकेसी, नोएडाप्रमाणे विकसित होणार आहे. या रस्त्याचे काम पूर्ण होईपर्यंत या भागातून होणारी वाहतूक लक्षात घेता जेएनपीए आणि अहमदाबादकडे जाणाऱ्या मार्गासाठी पर्याय शोधण्याचे निर्देश उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी नुकतेच दिले.
या भागातील नाशिक महामार्गाचे काम जलद गतीने पूर्ण करून वाहतुकीस अडथळा  निर्माण होणार नाही याची दक्षता घेण्याचे निर्देशही उपमुख्यमंत्र्यांनी यावेळी दिले. 
सह्याद्री अतिथीगृह येथे उपमुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी समृद्धी महामार्गावरील आमने नोड कामाचा आढावा घेतला. यावेळी शिक्षण मंत्री दादाजी भुसे, मृद व जलसंधारण मंत्री संजय राठोड, सार्वजनिक बांधकाम राज्यमंत्री मेघना बोर्डीकर, उपमुख्यमंत्र्यांचे प्रधान सचिव नविन सोना, महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक अनिल गायकवाड, रस्ते सचिव श्री. दशपुते आदी उपस्थित होते.
Tags

Post a Comment

0Comments

Post a Comment (0)

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!