नाशिक जिल्हा परिषद मुख्यालयात अग्निसुरक्षा जनजागृती कार्यशाळा उत्साहात

Cityline Media
0
 

नाशिक (दिनकर गायकवाड )
जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी आशिमा मित्तल यांच्या सूचनेनुसार जिल्हा परिषद मुख्यालयात अग्निसुरक्षा जनजागृती कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले.
या कार्यशाळेचे आयोजन नाशिक जिल्हा परिषद व फायर अँड सिक्युरिटी असोसिएशन ऑफ इंडिया नाशिक शाखेच्या वतीने करण्यात आले होते.जिल्हा परिषद कार्यालयातील अधिकारी,कर्मचारी व परिचर यांना आगीच्या घटनांपासून होणाऱ्या संभाव्य धोका व त्यावरील प्रतिबंधात्मक उपायांची माहिती मिळावी, तसेच कार्यालयीन पातळीवर अग्निसुरक्षा उपाय अधिक प्रभावीपणे राबवता यावेत, या उद्देशाने ही कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती.

या कार्यशाळेमध्ये सामान्य प्रशासन विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी रवींद्र परदेशी,फायर अँड सिक्युरिटी असोसिएशन ऑफ इंडिया

नाशिक शाखेचे अध्यक्ष हर्षद भामरे,सचिव आनंद दीक्षित, प्रशिक्षक मनोज कर्डिले व कमलेश भावसार उपस्थित होते.

 कार्यशाळेत अग्निसुरक्षेसंबंधी विविध बाबींची माहिती दिली. यामध्ये आग लागण्याचे विविध प्रकार, घन स्वरूपातील आग, द्रव स्वरूपातील आग,वायुरूप आग, धातूजन्य आग,विद्युत आग तसेच स्वयंपाकघरातील आग यांची माहिती देऊन, प्रत्येक प्रकारच्या आगीसाठी कोणते प्रतिबंधात्मक उपाय आवश्यक आहेत, हे समजावून सांगण्यात आले. कार्यशाळेच्या दरम्यान उपस्थित अधिकारी, कर्मचारी व परिचर यांना अग्निशमन

यंत्र वापरण्याचा सरावही करून घेण्यात आला, जेणेकरून आपत्कालीन परिस्थितीत योग्य निर्णय घेता येईल व संभाव्य जीवित व वित्तहानी टाळता येईल. या कार्यशाळेमुळे उपस्थितांना आगीसंबंधी माहिती मिळून त्यांच्या कार्यक्षमतेत वाढ होणार आहे, तसेच कार्यालयीन ठिकाणी आपत्ती व्यवस्थापन अधिक प्रभावीपणे करता येईल, अशी माहिती सामान्य प्रशासन विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी रवींद्र परदेशी यांनी दिली. या कार्यशाळेला जिल्हा परिषदेतील सर्व अधिकारी, कर्मचारी व परिचर मोठ्या संख्येने उपस्थित होते.
Tags

Post a Comment

0Comments

Post a Comment (0)

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!