इलाईट सर्टिफिकेशन अँड इनोवाटिव्ह सोल्युशन्स या संस्थेच्या वतीने संविधान विचार जागर स्पर्धेचे आयोजन
नाशिक (शिवाजी पगारे) संपूर्ण महाराष्ट्रातील विद्यार्थी आणि नागरिकांसाठी भारतीय संविधान अमृत महोत्सवानिमित्त घर घर संविधान निमित्त भारतीय संविधान विचार जागर स्पर्धा परीक्षा आयोजित करण्यात आली असल्याची माहिती येथील
इलाईट सर्टिफिकेशन अँड इनोवाटिव्ह सोल्युशन्स या संस्थेच्या वतीने नुकतीच देण्यात आली.
ऑफलाईन पद्धतीने होणाऱ्या या स्पर्धेसाठी नोंदणी प्रक्रिया सुरू झाली आहे.
स्पर्धेसाठी हे तरुण संविधान जागर रथ घेऊन राज्यभरात फिरून संविधानाच्या विचारांचा जागर करीत आहे.या वेळी संविधान जागर रथास यावेळी येथील आबासाहेब थोरात
सपना थोरात भीमराव थोरात धम्मापल इंगोले.माधवी जांभूळकर तुषार अहिरे आदी सहभागी आहेत संविधान जागर रथ नागपुरात दाखल झाला तेव्हा संविधान चौकात दाखल झाला
तेव्हा आमदार नितीन कुमार राऊत यांनी स्वागत केले.