सत्यशोधक लेखक महेश शिंदे यांचे वाचकांच्या वतीने आभार
लोकांसाठी.. लोकक्रांतीसाठी.. समाज माध्यमावर सुरू झालेले आहेत सिटीलाईन न्यूज हे वाचकांचे संपूर्ण वैचारिक समाधान करण्यात असताना अनेक अनाकलनीय विषयावर देखील प्रकाश टाकत जे विषय अनेकांना खोटे वाटते परंतु सत्य हेच आहे असे अनेक विषय आपल्या गावापर्यंत,गल्ली पर्यंत देखील पोहोचले आहेत हे नाकारताच येणार नाही अल्पावधीतच सिटीलाईन न्यूजने अनेक धाडसी विषय हाती घेतले त्याबद्दल त्यांचे कौतुक.
नुकतेच कराड येथील सत्यशोधक लेखक महेश शिंदे यांचा लग्नाबाहेरच्या लफड्यांना औपचारिकता मिळविण्याचा प्रयत्न हा लेख वाचला मन मेंदू सुन्न करणाऱ्या या लेखाने नक्कीच वाचकांचे वैचारिक समाधान होईल.
शिंदे सरांनी भारतात polygamous हे कल्चर खूप वाढत आहे...या लेखातुन जी वास्तविकता मांडली ती एकदम सत्य आहे.
मी सध्या फेसबुक वर जे काही रँडम अमेरिकन किंवा युरोपियन pages ला follow करते त्यात त्यांचे प्रामुख्याने हे विषय असतात की लग्ना आधी नो sex नो मल्टिपल पार्टनर एकनिष्ठ
नैतिकता monogamy
tradition and culture
Commitment
योग्य वयात लग्न लग्नासाठी योग्य जोडीदार कुटुंब संस्था आणि त्यात आपले योगदान
तर अमेरिकन युरोपियन देशात असे लोक आहेत जे polygamy च्या विरोधात आहेत आणि तरुण मुलं मुली या जाळ्यात अडकू नये म्हणून तिथे असे विचार करणारे लोकही बरेच आहे.
पण त्या उलट मी मराठी लोकांचे पोस्ट बघितले... तर त्यांचे विषय असे असतात की लग्न अनैसर्गिक आहे.माणूस प्राणी मुळातच polygamous आहे.
Extra marital affair आता common आहे. वैगरे वैगरे
त्यावर त्यांचे लॉगिक असे असतात की सर्व प्राणी polygamous असतात. आपण ही माणूस आहोत तर आपण monogamous कसे असू शकतो? माणसाला ही एका पेक्षा जास्त लोकांबाबत आकर्षण वाटतंच.
पण मला अस वाटतं की जो कुणी व्यक्ती स्त्री किंवा पुरुष एकाच वेळी एकापेक्षा जास्त पार्टनर सोबत शारीरिक भावनिक संबंध ठेवतो तेव्हा तो वेडा होतो.मानसिकरित्या कमकुवत, इतर आजारपण, सतत एक पार्टनर गेला की दुसऱ्याच्या शोधात एनर्जी घालवणे, पुन्हा जुन्या कोणत्या पार्टनरशी जमतंय का? अशी अपेक्षा ठेवणे म्हणजे सगळ्या प्रकारे गुंतागुंत करून ठेवणे. स्वतःला ही त्रास आणि पार्टनरला ही त्रास.
अनेक लोकांबाबतीत आकर्षण वाटणे आणि प्रत्यक्षात त्या अनेक लोकांसोबत संबंध ठेवणे यात खूप खूप फरक आहे. मनाला तर काही ही वाटू शकतं. "वाटलं म्हणून केलं"अस या बाबतीत तरी चालणार नाही. मनात येणारी प्रत्येक गोष्ट ही बरोबरच आहे असं तर काही नसतं.
हे स्त्री पुरुष दोघांच्या बाबतीत आहे.फरक एवढाच आहे की पुरुषांना polygamous रेलशनशीप चे फळं जरा उशिराच मिळतील.सुरुवातीचे काही वर्षे किंवा तरूण आहे तोवर त्याला त्यात आनंद वाटतो. त्याला माज ही असतो की त्याचा एवढा बॉडी काउन्ट आहे.तेच एखाद्या स्त्रीने असे संबंध ठेवले तर तिला लगेचच त्याचा त्रास जाणवू लागेल.स्त्रियांसाठी तर हे अजूनच धोकादायक आहे.
Polygamous रिलेशन्स मुळे शारीरिक मानसिक त्रास होत असताना तो व्यक्ती इतर ही गोष्टीत गोंधळ करून घेऊ शकतो. Mind body stability नसल्यामुळे तो इतर कोणत्याच गोष्टीच stability मिळवू शकत नाही.
Polygamy नैसर्गिक जरी असली तरी माणसाच्या अधोगतीचं कारण बनू शकते आणि त्याला उदवस्त ही करू शकते.
प्राची