वरवंडी (प्नतिनिधी) संगमनेर तालुक्याच्या पठार भागातील वरवंडी गावचे कामगार पोलिस पाटील नामदेव पांडुरंग केदारी (वय ६५) यांचे काल रात्री रणखांब फाट्या नजीक दुचाकी वाहनांच्या धडकेत अचानक दुदैवी निधन झाले.
त्यांच्या पाश्चात पत्नी एक मुलगा दोन मुली सुन नातवंडे असा परिवार आहे येथील हिराबाई.नामदेव केदारी यांचे ते पती होत तर भिमराज नामदेव केदारी यांचे ते वडील होत गेल्या ३० वर्षापासून ते वरवंडीचे पोलिस पाटील होते,पुरोगामी चळवळीतील एक सच्चा कार्यकर्ता आणि अनुयायी असणाऱ्या नामदेव केदारी यांच्या निधनाने वरवंडी पंचक्रोशीसह संगमनेर तालुक्यात हळहळ व्यक्त होत आहे.सिटीलाईन न्यूज परिवाराच्या वतीने त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली
