आश्वी राजेश गायकवाड आज जगभरात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची १३४ वी जयंती सर्वत्र मोठया प्रमाणात आणि उत्साहात साजरी केली जात आहे,भिम अनुयायांयाकडून ग्रामिण भागापासून ते शहरा पर्यंत बाबासाहेबांच्या प्रतिमेंला , पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले जाते .तर विविध कार्यक्रमांच्या माध्यमातून उत्सव निर्माण होवून अनेक जण आपापल्या परीने आपल्या मुक्ती दात्याला अभिवादन करतात, जमिनीपासून आकाशापर्यंत निळसर वातावरणाची निर्मिती होते भिम जयंती निमित्ताने अनेक सर्जनशील आणि चिकित्सक लोक जेथे जेथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर भेटीला गेले तेथे तेथे जाऊन त्यांच्या आठवणींना उजाळा देताना दिसतात तर असे अनेक ठिकाणे आपसुक चर्चेत येतात.
संगमनेर तालुक्यातील पानोडी येथील सरदार शिवराव भवानराव थोरात यांच्याशी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा कौटुंबिक जिव्हाळा होता .त्या संबंधातून सरदार थोरातांनी बाबासाहेबांना शिक्षणाकरिता विदेशात पाठवावे अशी शिफारस सयाजीराव गायकवाड यांच्याकडे त्यावेळी केली होती बॅरिस्टर झाल्यानंतर नगरच्या फिरोदियाच्या विरोधात सरदार थोराताची केस लढविली होती व जिंकली होती.त्या माध्यमातून डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी थोरातांच्या वाड्यात अनेकदा मुक्काम केल्याची,भोजन घेतल्याची आठवण थोरात यांच्या वारसांनी मनाच्या कुपीत जपून ठेवली आहे त्यावर ते अभिमानाने बोलतात.
१० डिसेंबर १९४२ रोजी डॉ. बाबासाहेबांनी नगरला भेट दिली, त्यावेळी संगमनेरचे वस्ताद दारोळे हे त्यांचे कट्टर समर्थक व अनुयायी सतत त्यांच्यासोबत सावलीसारखे असत. दिवंगत बी. जे.खताळ पाटील यांच्या आठवणीनुसार संगमनेरमध्ये डॉ. आंबेडकरांची सभा झाली होती. कौलाघात आंबेडकरी विचारांचा जागर लोकशाहीर विठ्ठल उमप यांनी आपली अनेक गीते व रचनांमधून केला आहे.ज्येष्ठ विचारवंत डॉ. रावसाहेब कसवे यांनीही सर्वांगीण विपुल लिखाण केले आहे. कवी दिनकर साळवे, शाहीर शिवाजी कांबळे यांचेही या कार्यात मोठे योगदान आहे.
-१९४२ ते २०१९ आंबेडकर आणि पानोडीच्या थोरातांचा जिव्हाळा निर्माण होऊन एक सामाजिक सलोख्यास आरंभ
डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी त्यांच्या रोजनिशी मध्ये पानोडीत सरदार थोरातांच्या वाडया मुक्कामी राहिलो असा उल्लेख केला ते वंचित बहुजन आघाडीचे सर्वसर्वा प्रकाश आंबेडकर यांच्या वाचण्यात आल्याने त्यांनी मुंबई येथील वकील ॲड. शंकरराव थोरात यांच्या जवळ पानोडीच्या वाडयाला भेट दयायची अशी इच्छा व्यक्त केली त्यानुसार सरदार शिवराव थोरात विदयालयाच्या नवीन इमारतीच्या उट्रघाटनच प्रकाश आंबेडकरांच्या हस्ते करण्यात आल्याने १९४२ नंतर २०१९ आंबेडकर - थोरातांच्या नातवांचा जिव्हाळा निर्माण होवून एक सामाजिक सलोखा तयार झाला .
-जग बदलणारा बापमाणूस
डॉ.बाबासाहेब आंबेडकर आणि पानोडीचा जिव्हाळा
सरदार थोरात व डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचे असणारे सलोख्याचे संबंध आमच्या वडील दिवंगत शिवाजीराव थोरात यांनी वेळोवेळी सांगितले त्यातून आंबेडकरांविषयी आस्था ,आपुलकी ,आदर आमच्या थोरात परिवारात पसरलेले आहे .
विक्रम थोरात ( सरदार थोरात यांचे पणतु )
संचालक -राजहंस दूध संघ ,उपसंरपच , पानोडी ता.संगमनेर पिन.४१३७३८
