वाईन शॉप विक्रीच्या भुलथापांना बळी पडल्याने दीड कोटीची फसवणूक

Cityline Media
0


नाशिक (दिनकर गायकवाड) अमित वाईन्सचा परवाना साडेसहा कोटी रुपयांत विक्री करण्याचे आमिष दाखवून एका व्यक्तीकडून वेळोवेळी पैसे घेऊन सुमारे दीड कोटीची फसवणूक केल्याप्रकरणी तीन जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी याबाबत दिलेली माहिती अशी,की आरोपी अमित सानप (रा.अशोका मार्ग, नाशिक),संदीप सुर्वे (रा. जेलरोड, नाशिकरोड) व नटेश शिंदे (रा. मुंबई) या तिघांनी संगनमत करून सन २०२३ ते ६ फेब्रुवारी २०२५ या कालावधीत नियोजनबद्ध पद्धतीने फिर्यादी मनीष गोपालदास व्यास (वय ४९,( रा.लखडगंज, नागपूर
यांचा विश्वास संपादन करून अमित सानप याच्या नावाच्या अमित वाईन्सचा परवाना साडेसहा कोटी रुपयांत विक्री करण्याचे आमिष दाखविले. त्यावर फिर्यादीचा विश्वास बसला.

त्यानंतर तिन्ही आरोपींनी मिळून वाईन परवाना विक्रीपोटी वेळोवेळी बँकेद्वारे व रोख स्वरूपात एकूण १ कोटी ४२ लाख ५० हजार रुपये घेतले; मात्र फिर्यादीशी ठरलेला व्यवहार पूर्ण न करता किंवा त्यांच्याकडून घेतलेली रक्कम त्यांना परत न करता पैसे देण्यास टाळाटाळ करून फिर्यादीची आर्थिक फसवणूक केली.

याप्रकरणी म्हसरूळ पोलीस ठाण्यात तिघा जणांविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला असून,पुढील तपास तपासी अधिकारी पोलीस उपनिरीक्षक जोशी करीत आहेत.
Tags

Post a Comment

0Comments

Post a Comment (0)

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!