नाशिक(दिनकर गायकवाड) येथील पी.डी.गांगुर्डे सोशल ग्रुप व सगुणा फाऊंडेशन यांच्या संयुक्त विद्यमानाने कामगार नेते स्व.पी. डी. गांगुर्डे यांच्या स्मृती दिनानिमित्ताने आयोजित टेनिसबॉल क्रिकेट स्पर्धेचे उद्घाटन आय. एस. पी. मजदूर संघाचे सचिव जगदीश गोडसे, सी. आय. एफ. एस. चे प्रमुख कमांडो सावंत यांच्या हस्ते करण्यात आले.
याप्रसंगी आय.एस.पी. मजदूर संघ कार्यध्यक्ष ज्ञानेश्वर जुद्रे उपाध्यक्ष राजेश टाकेकर आय.सगुणा फाऊंडेशनचे अध्यक्ष राजेश गांगुर्डे, राहुल रामराजे, राजेश चमोली, राजाभाऊ जगताप, सुधीर गायकवाड,ॲड. संजय खरे, ॲड.प्रसाद नागवंशी, विजय अहिरे, दीपक कटारे,अनिकेत गांगुर्डे व स्पर्धेचे आयोजक संदीप गांगुर्डे व दत्ता गांगुर्डे, शशांक उन्हवणे आदी उपस्थित होते.