डी पॉल इंग्लिश मिडीयम हायस्कूलात मुख्याध्यापिका सिस्टर सेलीन यांचा निरोप समारंभ उत्साहात

Cityline Media
0
श्रीरामपूर दिपक कदम येथील डी पॉल इंग्लिश मीडियम हायस्कूलात मुख्याध्यापिका सिस्टर सेलीन यांच्या निरोप समारंभाचा कार्यक्रम नुकताच पार पडला.
प्रसंगी लेझीमच्या तालासुरात सिस्टर यांचे आगमन झाले. त्यानंतर कार्यक्रमाचे प्रास्ताविक मॉली कुथूर यांनी केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन स्वाती घोरपडे यांनी केले. ज्योती ब्राह्मणे यांनी आपल्या स्वागत पर भाषणातून कार्यक्रमाची रूपरेषा सांगितली.

 सिस्टर ब्लेसा यांनी पुष्पगुच्छ देऊन सिस्टर सेलीन यांचा सत्कार केला.अनुराधा कपिले आणि सुनयना भालेराव यांनी आपल्या भाषणातून सिस्टर सेलीन यांनी गत तीन वर्षात केलेल्या कार्याचा आढावा सांगितला. सिस्टर सेलीन यांनी २०२२ ते २०२५ या त्यांच्या कार्यकाळात विलक्षण अशी कामगिरी बजावली.

त्यांचे व्यक्तित्व एक प्रेमळ, दयाळू, शिस्तप्रिय, उत्तम मार्गदर्शक, शांतताप्रिय अशा स्वरूपाचे आहे. विद्यालयातील विद्यार्थी शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांना खूपच कमी वेळात त्यांनी आपलेसे करून घेतले त्यांना निरोप देताना सर्वांचेच डोळे पाणावले होते.

 प्रत्येक व्यक्तीसाठी त्यांच्या आठवणी अविस्मरणीय आहेत. विद्यालयातील इयत्ता पहिली ते नववीच्या सर्व विद्यार्थ्यांनी त्यांच्या प्रति असलेले आपले प्रेम,आदर व सन्मान सांस्कृतिक कार्यक्रमांमधून प्रकट केला.हा सोहळा नेहमी सर्वांच्या स्मरणात राहील असाच होता.

या कार्यक्रमासाठी रवींद्र लोंढे, गणेश पवार ,संदीप निबे,विकास वाघमारे, संजय खेमनार ,दिपक कदम, सुनील बोरगे ,अनिता बोधक, नंदा पवार ,अपर्णा नायर, माधुरी महाडिक, मोहिनी बाहुली, स्वाती गायकवाड, पूजा थोरात, प्रतीक्षा साळवे यांनी अथक परिश्रम घेतले. कार्यक्रमा अंती सौ प्रतीक्षा कोळगे यांनी उपस्थित पालक वर्ग,फादर, सिस्टर, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थ्यांचे आभार मानले.
Tags

Post a Comment

0Comments

Post a Comment (0)

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!