अलिगड (सिटीलाईन मिडिया नेटवर्क)
होणाऱ्या जावयासह सासू पळून गेल्याची घटना घडली आहे. त्यांचे शेवटचे ठिकाण उत्तराखंड मधील रुद्रपूर जवळ सापडले असले तरी अद्याप त्यांचा तपशील मिळू शकलेला नाही.दरम्यान,पळून गेलेल्या महिलेचा पती जितेंद्रने इतर अनेक गोष्टी सांगितल्याने पोलिसांनाही धक्का बसला.
महिलेचा पती जितेंद्रने सांगितले की,त्याची पत्नी त्यांचा होणारा जावई राहुल आजारी असल्याने त्याच्या घरी जात आहे.जितेंद्रला वाटले होते की,पत्नी फक्त त्याच्या तब्येतीची विचारपूस करून परत येईल.पण वास्तव काही वेगळेच निघाले.ती पाच दिवस राहुलच्या घरी एकटीच राहिली.पाच दिवसांनी, ती आपल्या गावी परतली पण राहुल सोबत.राहुलने त्या महिलेला गावातील प्राथमिक शाळेजवळ सोडले आणि नंतर निघून गेला.
त्यावेळी कोणालाही काहीही संशय आला नाही,पण दुसऱ्या दिवशी दोघांनीही पळून जाऊन सर्वांना धक्काच दिला.महिलेच्या पतीने पोलीस ठाण्यात बेपत्ता पत्नीची आणि जावयाची तक्रार दाखल केल्यानंतर पोलिसांनी कारवाई सुरू केली.अलिगढ जिल्ह्यातील मद्रक पोलीस ठाणे परिसरातून हा प्रकार समोर आला आहे.
वडिलांनी आपल्या मुलीचे लग्न दादोन पोलीस ठाणे परिसरातील एका तरुणाशी ठरवले होते. त्यांचा विवाह १६ एप्रिल रोजी होणार होता. नातेवाईकांमध्ये पत्रिकाही वाटण्यात आल्या होत्या. मात्र, लग्न १० दिवसांवर येऊन ठेपलेले असताना नवरी मुलीच्या आईने होणाऱ्या जावयासोबत पळून जात लग्न केले आणि घरातील संपत्तीही नेली.या घटनेमुळे व्यथित झालेली नवरी सतत रडत आहे.त्यामुळे त्या मुलीची प्रकृती बिकट झाली आहे. होणाऱ्या नवरदेवाने त्याच्या वडिलांना फोनवर सांगितले की शोधण्याचा प्रयत्न करू नका, आम्ही परत येणार नाही.
