सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात कृषी महाविद्यालयाच्या नवीन इमारतीचे भूमिपूजन उत्साहात

Cityline Media
0
संगमनेर (दिपक कदम ) येथील अमृतवाहिनी शेती व शिक्षण विकास संस्था संचलित सहकारमहर्षी भाऊसाहेब थोरात कृषी महाविद्यालयाच्या नवीन इमारतीचा भूमिपूजन सोहळा माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांच्या हस्ते उत्साहात पार पडले.
सोहळ्यास अमृतवाहिनी महाविद्यालयाच्या विश्वस्त सौ. शरयू देशमुख, डॉ.जयश्री थोरात,अमृतवाहिनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी अनिल शिंदे, व्यवस्थापक विवेक धुमाळ,कृषी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. राजेंद्र वाघ तसेच विविध मान्यवर, शिक्षकवृंद आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

नवीन इमारतीच्या उभारणीमुळे विद्यार्थ्यांना अत्याधुनिक सुविधा प्राप्त होतील आणि कृषी शिक्षण क्षेत्राला नवी दिशा मिळेल.तसेच हे कृषी महाविद्यालय शेतकऱ्यांसाठी मार्गदर्शनाचे केंद्र ठरेल,असे मत माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांनी यावेळी व्यक्त केले.
Tags

Post a Comment

0Comments

Post a Comment (0)

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!