श्रीरामपूर दिपक कदम येथील ह्जरत सैलानी बाबा दरबार यांचे ६६ व्या उर्स शरीफ चादर मिरवणूक मोठ्या उत्साहात पार पडली.
अनेक वर्षांपासूनची परंपरेप्रमाणे याही वर्षी हजरत सैलानी बाबा दरबार वार्ड क्र.३ श्रीरामपूर यांचा ६६ वा संदल शरीफ दिनांक नुकताच पार पडला.बाबांच्या दरबार पासून दुपारी पाच वाजता मिरवणुकीची सुरुवात झाली शेकडोच्या संख्येने भाविकांनी हजेरी लावत ढोल ताशाच्या गजरात मिरवणूक शहरातील मुख्य मेन रोड मार्गे गांधी चौक तसेच पोलीस ठाण्या समोरून छत्रपती शिवाजी महाराज चौकातून शिवाजी रोड मार्गे पुन्हा हजरत सैलानी बाबा दर्गा या ठिकाणी मिरवणूक मोठ्या आनंदोत्सवात मंदिरात संदल मिरवणूक दहा वाजता आल्यानंतर विधीवत (फातीया खाणी दुवा)चादर अर्पण करून प्रसादाचे वाटप करण्यात आले.
प्रसंगी श्रीरामपूर शहर अप्पर पोलीस अधीक्षक पोलीस अधिकारी डॉ.बसवराज शिवपुजे श्रीरामपूर शहर पोलीस निरीक्षक नितीन देशमुख यांनी पोलिसांचा चौख बंदोबस्त ठेवला कायदा व सुव्यवस्था व्यवस्था राखण्यासाठी योग्य असे नियोजन केले संदल मिरवणूक यशस्वीरीत्या पार पाडण्यासाठी हजरत सैलानी बाबा बहुउद्देशीय संस्था यांचे सर्व पदाधिकारी व सदस्य यांनी परिश्रम घेतले
