नाशिक (दिनकर गायकवाड)
एचपीटी आस आणि आरवायके सायन्स कॉलेजची विद्यार्थिनी आर्या बोरसे हिने अर्जेंटिनाच्या ब्युनॉस आयर्समध्ये आयोजित वर्ल्ड कप सिल्व्हर मेडल मिश्र शुटिंग स्पर्धेत रौप्यपदक पटकावून देशाचे नाव जागतिक पातळीवर उज्ज्वल केले आहे.
या अभिमानास्पद यशाने कॉलेजच्या शारीरिक शिक्षण विभाग आणि क्रीडा क्षेत्रात एक मोठा मापदंड स्थापित केला आहे.या अभिमानास्पद यशाबद्दल
संस्थेच्या सचिव डॉ. दीप्ती देशपांडे, व्यवस्थापन विभागप्रमुख शैलेश गोसावी, प्राचार्य डॉ. व्ही. एन. सूर्यवंशी, उपप्राचार्य डॉ. पी. एस. देशपांडे, उपप्राचार्य डॉ. ए. एस. घनबहादूर आणि संस्थेचे विभागीय सचिव राम कुलकर्णी यांनी आर्या बोरसे हिचे अभिनंदन केले.
त्याचबरोबर शारीरिक शिक्षण संचालक आनंद विश्वकर्मा आणि क्रीडाप्रमुख योगेश शिंदे यांनीही तिच्या उज्ज्वल भविष्यासाठी शुभेच्छा दिल्या.
आर्याच्या यशाने हे सिद्ध केले की कठोर मेहनत आणि समर्पणाने कोणत्याही क्षेत्रात उत्कृष्टता मिळवता येऊ शकते.कॉलेजच्या विद्यार्थिनीने जागतिक पातळीवर हे यश मिळविले असून,तिच्या क्रीडाप्रेमी साहस व भविष्यातील सर्व स्पर्धांत यश मिळण्यासाठी सर्वांनी शुभेच्छा दिल्या आहेत.
