हिराचंद ब्राह्मणे स्मृतीगंध या कार्यगौरव लेख संग्रहाचे प्रकाशन
श्रीरामपूर (दिपक कदम) सामाजिक बांधिलकी जोपासून शैक्षणिक कार्य करणाऱ्या हिराचंद ब्राह्मणे यांचे लोणी प्रवरा परिसराच्या जडणघडणीत योगदान राहिलेले असून शिक्षण हाच प्रगतीचा पाया असल्याचा विचार त्यांनी आपल्या कृतीतून दिला आहे,संस्कारीत पिढी घडवण्यासाठी त्यांच्या विचारांनी पुढे जाणे आवश्यक आहे.असे प्रतिपादन जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्ष सौ.शालिनी राधाकृष्ण विखे पा.यांनी नुकतेच लोणी येथे केले.
एच के.तथा हिराचंद ब्राह्मणे यांच्या प्रथम स्मृतीदिनाचे औचित्य साधून त्यांचे स्नेही,सहकारी,विद्यार्थी, नातेवाईक यांनी लिहिलेल्या स्मृतीगंध (शब्दगंध प्रकाशित) या कार्यगौरव आदरांजली पर लेखसंग्रहाच्या प्रकाशन प्रसंगी त्या बोलत होत्या.
प्रसंगी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ज्येष्ठ साहित्यिक प्रा.डॉ.बाबुराव उपाध्ये होते,तर प्रमुख पाहुणे म्हणून प्राचार्य डॉ.विजय राठी, शब्दगंधचे संस्थापक सुनील गोसावी, दैनिक सार्वमतचे संपादक अशोक गाडेकर,श्रीरामपूरचे ॲड.अनिल काळे, बेलापूर कॉलेजचे मा.प्राचार्य डॉ.भाऊसाहेब पवार, सेवानिवृत्त पोलीस अधिकारी, साहित्यिक सुभाष सोनवणे, पंचायत समितीच्या माजी सभापती, सौं.नंदा तांबे लोणी बुद्रुकच्या सरपंच सौ.कल्पना मैड ,पद्मश्री विखे पाटील सहकारी साखर कारखान्याचे संचालक.दादा पाटील घोगरे,जेष्ठ नेते शांतीनाथ आहेर, प्राचार्य डॉ हरिभाऊ आहेर, एम.वाय.विखे, गुणवंत आठरे, उपाभियंता गणेश नान्नोर,आदी मान्यवर उपस्थित होते.
यावेळी पुढे बोलताना सौ.शालिनी विखे पा.म्हणाल्या की,शैक्षणिक क्षेत्रातील बदलाच्या प्रक्रियेसाठी स्वतःला झोकून देऊन हिराचंद ब्राह्मणे यांनी काम केलेले आहे, त्यांचे शैक्षणिक व साहित्यिक कार्य वाखाणण्याजोगे आहे, त्यामुळेच त्यांच्या प्रथम स्मृतिदिनी स्मृतिगंध या लेखसंग्रहाचे प्रकाशन होत आहे,पुढच्या पिढीसाठी हा ग्रंथ प्रेरणादायी असेल.साहित्यिक सुभाष सोनवणे यावेळी बोलताना म्हणाले की, हिराचंद ब्राह्मणे यांचे आचार, विचार व लेखन समाजाला पुढे घेऊन जाणारे होते, सर्वांच्या मध्ये मिळून मिसळून वागणारे हिराचंद ब्राह्मणे आदर्श असे व्यक्तिमत्त्व होते, त्यामुळे त्यांच्या कार्याला सलाम केला पाहिजे.
कार्यक्रमाचे अध्यक्ष प्रा. डॉ. बाबुराव उपाध्ये बोलताना म्हणाले की, शैक्षणिक क्षेत्रात असूनही हिराचंद ब्राह्मणे यांचे ऐतिहासिक लेखन अतिशय चांगले होते.त्यांच्या सर्वच कादंबऱ्या लोकप्रिय होत्या.त्यांनी कायमच माणूसपण जपण्याचे काम केले, त्यांच्या विचारांचा वारसा सर्वांनी जपणे आवश्यक आहे.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक करताना सुनील गोसावी म्हणाले की,हिराचंद ब्राह्मणे यांच्या कार्यांचा लेखाजोखा पुढच्या पिढीला मिळावा यासाठी स्मृतिगंध या पुस्तकाची निर्मिती संतोष ब्राह्मणे यांच्या पुढाकाराने होत आहे.
यावेळी ॲड.अनिल काळे, अशोक गाडेकर, प्राचार्य डॉ. भाऊसाहेब पवार यांनी आपले मनोगत व्यक्त केले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्राचार्य सत्तार शेख यांनी केले तर अंतिमतः कु.मेघा संतोष ब्राह्मणे यांनी आभार मानले.
स्मृतीशेष हिराचंद ब्राह्मणे स्मृती साहित्य पुरस्काराचे वितरण
प्रसंगी हिराचंद ब्राह्मणे यांनी ज्या ज्या विद्यालयात शिक्षण घेतले,नोकरी केली,त्या ठिकाणच्या दहावी व बारावीत प्रथम आलेल्या विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला.तसेच शिक्षक रावसाहेब ब्राह्मणे,बाळासाहेब इलग, सखाराम लबडे यांचा गुणवंत शिक्षक पुरस्काराने सन्मान करण्यात आला.लोणी प्रवरा परिसरातील ज्येष्ठ साहित्यिक, कवी यशवंत पुलाटे यांच्या साहित्यिक कार्याचा स्मृतीशेष हिराचंद ब्राह्मणे स्मृती साहित्य पुरस्कार देऊन गौरव करण्यात आला.
कार्यक्रमास ज्येष्ठ कवी भास्कर लगड,कवी आनंदा साळवे, प्रा.गफूर शेख,प्रा संजय गिरी, प्रा. अशोक बिडगर, ज्ञानदेव गिते, राजाराम टपळे, रवी कदम, संतोष उबाळे, प्रभाकर थोरात,साहेबराव तुपे, यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.
कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी.मा.पंचायत समिती सदस्य संतोष ब्राह्मणे,सुदाम माळी, नंदराज कदम , प्रा.गौतम भोसले ,सुमेध ब्राह्मणे, विजय तांबे यांनी विशेष परिश्रम घेतले.