सुरत सिटीलाईन मिडिया नेटवर्क गुजरातमध्ये काँग्रेसची संघटना बळकट करणे,कार्यकर्त्यांना सशक्त करणे आणि लोकशाही व संविधानाच्या रक्षणासाठी निर्णायक लढा उभारणे, हा या अभियानाचा उद्देश घेऊन गुजरातच्या सुरत मध्ये काँग्रेसचे हे अभियान सुरू असून या अभियानासाठी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात उपस्थित असून त्यांनी अभियानाचे महत्त्व सांगण्यासाठी पत्रकार परिषदेला संबोधित केले.
काँग्रेस अध्यक्ष.मल्लिकार्जुन खरगे व विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस गुजरातमध्ये अधिक ताकतीने संघर्ष करेल असे मत यावेळी बाळासाहेब थोरात साहेब यांनी व्यक्त केले.
या पत्रकार परिषदेला मा. केंद्रीय मंत्री भरतसिंग सोळंकी, मा खा. किशन पटेल, मा. अध्यक्ष परिमल राणा, सुरत अध्यक्ष धनसुख राजपुत, कार्यकारी अध्यक्ष विपुल उदानावाला, दिनेश सावलिया, मिडिया समन्वयक कल्पेश बारोट आदी पदाधिकारी उपस्थित होते.
उद्या ६ विधानसभा मतदारसंघातील कार्यकर्त्यांशी मा.मंत्री, बाळासाहेब थोरात हे संवाद साधणार आहे.