मुक्त विद्यापीठाच्या विद्यार्थ्यांना ऑनलाइन गृहपाठाची सक्ती

Cityline Media
0
नाशिक (दिनकर गायकवाड) यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाच्या कला-वाणिज्य शाखेच्या प्रथम वर्ष विद्यार्थ्यांना गृहपाठ ऑनलाईन पद्धतीने सादर करणे अनिवार्य आहे.जे विद्यार्थी ऑनलाईन गृहपाठ सादर करणार नाहीत व मे २०२५ मध्ये आयोजित परीक्षेत एखाद्या अभ्यासक्रमामध्ये अनुत्तीर्ण झाले,तर त्यांना गृहपाठ पुन्हा सादर करता येणार नाहीत. त्यामुळे संबंधित सर्व विद्यार्थ्यांनी आपले गृहपाठ हे येत्या दिनांक १५ मे पर्यंत ऑनलाईन पद्धतीने सादर करावेत, असे आवाहन विद्यापीठाच्या परीक्षा विभागाच्या वतीने करण्यात आले आहे.
यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाचे कुलगुरू प्रा. संजीव सोनवणे यांच्या मार्गदर्शनाखाली विद्यापीठाच्या उन्हाळी परीक्षा येत्या दि. २७ मे रोजी सुरू होत आहेत. त्याअंतर्गत शैक्षणिक वर्ष २०२४-२५ मध्ये प्रवेश घेतलेल्या प्रथम वर्ष कला व वाणिज्य शिक्षणक्रमाच्या नियमित विद्यार्थ्यांना व नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरणांतर्गत असणाऱ्या पदव्युत्तर शिक्षणक्रमांसाठी गृहपाठ ऑनलाईन पद्धतीने सादर करणे अनिवार्य आहे. 

विद्यापीठाने विद्यार्थ्यांना त्यांचे सातत्यपूर्ण मूल्यमापन, अंतर्गत मूल्यमापन करण्यासाठी आवश्यक असलेल्या गुणांकरिता विद्याथ्यनि हस्तलिखित केलेले गृहपाठ ऑनलाईन स्वीकारून, त्याचे मूल्यांकन विद्यार्थी ज्या अभ्यासकेंद्रावर प्रवेशित आहे, त्या अभ्यासकेंद्रावरील समंत्रक, शिक्षकांकडून ऑनलाईन मूल्यमापन करण्याची कार्यप्रणाली व ऑनलाईन ओअॅसिस पोर्टल विकसित केले आहे. या कार्यप्रणालीमध्ये विद्यार्थ्यांना

लॉग ईन उपलब्ध करून देण्यात येऊन, त्यात विषयनिहाय गृहपाठाचे प्रश्न, क्यूआर कोड अंकित व त्यांची वैयक्तिक माहिती असलेली उत्तरपुस्तिका व त्यासोबत सोडवावयाचे गृहपाठाचे प्रश्न असलेली उत्तरपुस्तिका डाऊनलोड व छपाईसाठी उपलब्ध करून देण्यात आलेली होती. विद्याश्यनि या उत्तरपुस्तिकेवर आपल्या हस्ताक्षरामध्ये लिहून त्या पीडीएफ स्वरूपात पोर्टलवर अपलोड करायच्या आहेत.

परीक्षा विभागाच्या असे निदर्शनास आले आहे, की प्रथम वर्ष कत्रा व वाणिज्य या शिक्षणक्रमाच्या बहुतांशी विद्यार्थ्यांनी ऑनलाईन गृहपाठ सादर करणे, हे अनिवार्य असतानाही गृहपाठ अपलोड केलेले नाहीत. ऑनलाईन गृहपाठ सादर न केलेल्या अनुत्तीर्ण विद्यार्थ्यांना पुढील परीक्षेच्या वेळी बहिःस्थ परीक्षेमध्ये ४० गुण उत्तीर्ण होण्यासाठी प्राप्त करावे लागतील. 

ज्या शिक्षणक्रमांना ऑनलाईन गृहपाठ सादर करणे आवश्यक आहे. याची यादी तसेच ऑनलाईन गृहपाठ सादर करण्यासंदर्भातील मार्गदर्शक सूचना व कार्यपद्धतीचा व्हिडिओ http://asm.ycmou.org.in/ या संकेतस्थळावर उपलब्ध आहे, तसेच अभ्यासकेंद्रावरील कार्यरत समंत्रकांनीदेखील सादर ऑनलाईन गृहपाठाची तपासणी विहित मुदतीत करणे आवश्यक आहे. जेणेकरून विद्याव्यांचे शैक्षणिक नुकसान टाळता येईल. तरी विद्यार्थ्यांनी गृहपाठ ऑनलाईन पद्धतीने दि. १५ मेच्या आत सादर करावेत, असे आवाहन विद्यापीठाचे परीक्षा नियंत्रक भटूप्रसाद पाटील यांनी केले आहे.
Tags

Post a Comment

0Comments

Post a Comment (0)

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!