विनायक देशमुख यांना विश्वास
अहिल्यानगर: प्रतिनिधी अहिल्यानगर एम.आय.डी.सी.तील ऑटो व इंजीनियरिंग क्लस्टरमुळे कौशल्य विकास कार्यक्रमाला चालना मिळेल," असा विश्वास कौशल्य विकास समितीचे सदस्य. विनायक देशमुख यांनी व्यक्त केला.
श्री. देशमुख यांनी आज एम.आय.डी.सी.तील ऑटो व इंजीनियरिंग क्लस्टरला भेट देऊन तेथील प्रशिक्षण सुविधांची पाहणी केली. यावेळी श्री.देशमुख यांच्या समवेत जिल्हा उद्योग केंद्राचे महाव्यवस्थापकं संतोष गवळी, कौशल्य विकास विभागाचे सहाय्यक आयुक्त निशांत सूर्यवंशी, "आमी" या संघटनेचे अध्यक्ष.जयद्रथ खाकाळ उपस्थित होते. याप्रसंगी क्लस्टरचे अध्यक्ष. दौलत शिंदे यांनी श्री.देशमुख यांचे स्वागत केले.
यावेळी बोलताना श्री. देशमुख म्हणाले ," ऑटो व इंजीनियरिंग क्लस्टरमुळे अहिल्यानगर एम.आय.डी.सी. मध्ये प्रशिक्षणाची अद्यावत सुविधा उपलब्ध झाली आहे. केंद्र आणि राज्य सरकारच्या विविध प्रशिक्षण कार्यक्रमाची या क्लस्टरशी सांगड घातल्यास जिल्ह्यातील उद्योग आस्थापनांसाठी मोठे प्रशिक्षित मनुष्यबळ निर्माण होण्यास मदत होईल व अनेक बेरोजगार युवकांना रोजगार उपलब्ध होईल . सध्या उद्योग खात्याच्या सचिव पदाचा कार्यभार अहिल्यानगरचे माजी जिल्हाधिकारी डॉ. पी. अनबल्गन यांच्याकडे आहे. एम.आय.डी.सी.तील अनेक प्लॉटचा कायदेशीर गुंता बऱ्याच दिवसापासून प्रलंबित आहे. त्या दृष्टीने आपण पालकमंत्री नामदार राधाकृष्ण विखे पा.यांच्या सहकार्याने हा प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न करू,"असे श्री. देशमुख यांनी सांगितले.
यावेळी क्लस्टर बाबतची माहिती देताना क्लस्टरचे अध्यक्ष. दौलत शिंदे यांनी सांगितले ," या क्लस्टरमध्ये प्रशिक्षणासाठी अद्यावत यंत्रसामग्री उपलब्ध आहे.तसेच १५० पेक्षा जास्त युवकांसाठी व ८० पेक्षा जास्त महिलांसाठी निवासाची सुविधा देखील उपलब्ध आहे. अहिल्या नगर शहरातील व जिल्ह्यातील युवकांनी याचा जास्तीत जास्त लाभ घेऊन रोजगारक्षम प्रशिक्षित व्हावे, अशी अपेक्षा आहे."