परभणीच्या रस्त्यांवर आज एक आगळीच ऊर्जा अनुभवायला मिळाली –
बंधुता,लोकशाही आणि सामाजिक न्यायाच्या मूल्यांना साक्ष देणारी,संविधानाच्या रक्षणासाठी झपाटलेली काँग्रेसची “सद्भावना आणि संविधान बचाव यात्रा” जनतेच्या प्रचंड प्रतिसादात गगनभेदी घोषणांसह मार्गक्रमण करत गेली! हजारो नागरिक, युवक, महिला, शेतकरी, कामगार – सर्वांनी एकत्र येत “आमचं संविधान, आमचा अभिमान!” असा नारा दिला.
ही यात्रा केवळ राजकीय नाही, तर लोकशाही मूल्यांप्रती असलेली जनतेची निष्ठा आणि सजगतेचं प्रतीक ठरली.
या ऐतिहासिक यात्रेवेळी उपस्थित मान्यवरांनी परभणीच्या भूमीला आंदोलनशील ऊर्जा दिली:
रमेश चेन्निथला – महाराष्ट्र काँग्रेस प्रभारी
हर्षवर्धन सपकाळ - प्रदेशाध्यक्ष, महाराष्ट्र कॉंग्रेस
विजय वडेट्टीवार – विधिमंडळ पक्षनेते
माणिकराव ठाकरे – गोवा प्रभारी
खा.चंद्रकांत हंडोरे - काँग्रेस वर्किंग कमिटी सदस्य नसीम खान,खा. प्रणिती शिंदे, खा.डॉ.कल्याण काळे, खा. रविंद्र चव्हाण,.कुणाल चौधरी.यु.बी.व्यंकटेश, मोहन जोशी, आ.अमित झनक,.कैलास गोरंट्याल, तुकाराम रेंगे पाटील,.विलास औताडे, कैलास कदम,वजाहत मिर्झा,भानुदास माळी, सुरेश वरपुडकर,नदीम इमानदार, राहुल बोंद्रे, ब्रीज दत्त, जितेंद्र देहाडे, विश्वजीत हाप्पे, धीरज पाटील, धनराज राठोड, मुजाहिद खान, जफर खान, अभय देशमुख आणि इतर कार्यकर्ते उपस्थित होते
परभणीकरांनी दिलेला हा लोकशाहीचा कौल – महाराष्ट्रात परिवर्तनाची नांदी ठरणार आहे!
संविधान वाचवण्यासाठी आणि सामाजिक समतेसाठी लढणाऱ्या प्रत्येक नागरिकास ही यात्रा नवी दिशा देत आहे!
जय संविधान, जय लोकशाही!
