कोल्हार तसेच परिसरातील प्रवरानगर, लोहगाव,लोणी,कडीत,मांडवे, फत्याबाद, कोल्हार खुर्द, तिसगाव,राजुरी,बाभळेश्वर, चिंचोली या ठिकाणी वादळी वाऱ्यासह अचानक गारांचा पाऊस झाला यामुळे परिसरातील कांदा उत्पादक शेतकऱ्याची धावपळ उडाली आहे. तसेच प्लास्टिकचा कागद,ताडपत्री याच्या सहाय्याने शेतकरी वर्ग कांदा झाकून ठेवत आहे. परंतु जोरात सुटणारे वारे यामुळे शेतकऱ्यांना मोठी कसरत करावी लागत असून कांदा काढल्यानंतर कांदा चाळीमधे साठवण्याआधी दहा दिवस कांदा मुरून दिला जातो आणि सध्या शेतात आरण लावून ठेवलेला कांदा अचानक येणाऱ्या पावसामुळे कांदा भिजण्याची दाट शक्यता आहे. यामुळे आता बळीराजा देखील कुठेतरी संकटात सापडलेला दिसत आहे.
कोल्हार परिसरात अचानक गारांसह अवकाळी पावसाचा तडाखा; शेतकरी चिंतेत
May 06, 2025
0
श्रीरामपूर दिपक कदम राहाता तालुक्यात काही ठिकाणी अवकाळी पावसाचे वातावरण अचानक तयार होऊन अवकाळी पावसाने हजेरी लावल्याने कांदा उत्पादक शेतकऱ्यांची तारांबळ उडाली असून पावसापासून कांद्याचे संरक्षण करण्यासाठी शेतकऱ्यांना मोठी कसरत करावी लागत आहे.
Tags
