वैष्णवी हगवणे यांचा फरार सासरा,दीर जेरबंद;रात्री केली मद्यधुंद मटन पार्टी

Cityline Media
0
पुणे सिटीलाईन न्यूज नेटवर्क वैष्णवी हगवणे मृत्यू प्रकरणातील मुख्य आरोपीं पैकी असलेल्या करार सासऱ्याला राजेंद्र हगवणे आणि दीर सुशील हगवणे यांना अखेर सातव्या दिवशी पिंपरी चिंचवड पोलिसांनी अटक केली आहे.
या दोघांना सापळा रचून ताब्यात घेण्यात आले. या प्रकरणात वैष्णावीच्या सासू,पती आणि नणंद यांना यापूर्वीच अटक करण्यात आली होती.पोलिसांच्या तपासानंतर उघड झालेल्या अनेक धाकादायक बाबींमुळे समाजात संतापाची लाट उसळली आहे.वैष्णवीचा तिच्या सासरी संशयास्पद मृत्यू झाला होता.प्राथमिक माहितीनुसार,तिथा मानसिक आणि शारीरिक छळ केला जात होता, असा आरोप तिच्या माहेर कडील लोकांनी केला आहे.या प्रकरणाने राज्यभरात खळबळ उडवून दिली असून, आता या संपूर्ण प्रकरणात न्यायासाठी मोठा आवाज उठवला जात आहे. राजेंद्र आणि सुशील हगवणे हे दोघेही गेल्या काही दिवसांपासून फरार होते. पोलिसांनी त्यांचा शोध घेण्यासाठी विशेष पथक तयार केले होते.अखेर आज पहाटे पिंपरी मधील एका ठिकाणी त्यांचा ठाव ठिकाणा लागल्यावर पोलिसांनी छत्या टाकत दोघांना ताम्यात घेतले. सध्या त्यांना तुरुंगात डांबले आहे त्या प्रकरणात आणखी ठोस पुरावे गोळा करण्याचे काम पोलिसांकडून सुरु आहे. लवकनच या प्रकरणात आणखी काही कादायक बाबी समोर येण्याची शक्यता आहे.
Tags

Post a Comment

0Comments

Post a Comment (0)

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!