नवी दिल्ली सिटीलाईन न्यूज नेटवर्क पाकिस्तानने अनेक फेक न्यूज पसरवल्यात.भारतीय तळांवरच्या हल्ल्यांसंबंधी पाककडून दिशाभूल सुरु आहे. पाकचे दावे भारताने फेटाळून लावले आहे.पाककडून सीमाभागात लष्कर तैनात वाढत आहे.भारताने पाकिस्तानला आतापर्यंत चोख प्रत्युत्तर दिले आहे. भारतीय युद्धप्रणाली पाकिस्तानच्या युद्धप्रणाली उद्ध्वस्त करताय,अशी माहती सोफिया कुरेश यांनी दिली.
परराष्ट्र सचिव विक्रम मिस्त्री यांच्यासह कर्नल सोफिया कुरेशी आणि व्योमिका सिंग यांनी नुकतीच पुन्हा पत्रकार परिषद घेत विविध माहिती दिली.
कर्नल सोफिया कुरेशी यांनी म्हटले की,पाकिस्तानकडून भारताच्या पश्चिमी सीमेवर ड्रोन, लांब पल्ल्याची क्षेपणास्त्रे, लॉटरिंग मिशन ड्रोन आणि लढाऊ विमानांच्या साहाय्याने भारताच्या लष्करी तळांना आणि नागरी वस्त्यांना लक्ष्य केले जात आहे. सीमारेषेवरही पाकिस्तानकडून जोरदार गोळीबार सुरु आहे. नियंत्रण रेषेवर २६ ठिकाणी पाकिस्तानने हवाई घुसखोरीचा प्रयत्न केला आहे. मात्र, भारताने जवळपास सर्व हल्ले निष्प्रभ केले आहेत. तरीही उधमपूर, पठाणकोट, भूज, आदमपूर, भटिंडा येथे लष्करी तळावर काहीप्रमाणात हानी झाली आहे. पाकिस्तानने शुक्रवारी पहाटे १ वाजून ४० मिनिटांनी पंजाबमधील लष्करी तळावर हल्ला करण्यात आला. यावेळी श्रीनगर, अवंतीपूर आणि उधमपूर येथील हवाई तळ आणि एका शाळेला लक्ष्य करण्यात आले.
मध्यरात्री पंजाबमधील लष्करी तळावर हल्ला करण्यात आला. यावेळी श्रीनगर, अवंतीपूर आणि उधमपूर येथील हवाई तळ आणि एका शाळेला लक्ष्य करण्यात आले.
पाकिस्तानच्या या हल्ल्याला प्रत्युत्तर देताना भारतीय सैन्याने पाकिस्तानच्या टेक्निकल इन्स्टॉलेशन, कमांड सेंटर, रडार साईट आणि शस्त्रांच्या गोदामाला लक्ष्य केले पाकिस्तानच्या रफिकी, मुरीद, चकलाला, रहिम यार, सुकूर या हवाई तळांवर हल्ले करण्यात आले. या पाच ठिकाणी भारतीय वायूदलाच्या फायटर जेटनी हल्ला केला. यामध्ये कुसूर येथील रडार आणि सियालकोट येथील लष्करी तळाला लक्ष्य करण्यात आले. पाकिस्तानकडून लाहोरवरुन नागरी हवाई उड्डाणासाठी वापरण्यात येणाऱ्या आंतरराष्ट्रीय मार्गाचा दुरुपयोग केला जात आहे. पाकिस्तानी विमानांच्या हालचाली गुप्त ठेवण्यासाठी हे सुरु आहे. तसेच पाकिस्तानकडून भारताविरोधात अपप्रचार केला जात आहे, असे कर्नल सोफिया कुरेशी यांनी सांगितले.
भारतीय सीमा सुरक्षा दलाने जम्मू आणि काश्मीरच्या सीमावर्ती भागात दहशतवाद्यांविरुद्ध कारवाई केली. या कारवाईत ७ दहशतवाद्यांना ठार करण्यात आले आहे. आता या पाठोपाठ भारतीय सैन्याकडून २८ दहशतवाद्यांना कंठस्नान घालण्यात आले आहे.
मी जिथे आहे तिथून, अधूनमधून स्फोटांचे आवाज ऐकू येतात, असे मुख्यमंत्री ओमर अब्यूड़ा यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म द वर एका पोस्टमध्ये म्हटले आहे. त्यांनी अंधारात बुडालेल्या शहराचा फोटो देखील पोस्ट केला आणि जम्मूमध्ये वीजपुरवठा खंडित झाल्याचे त्यांनी कॅप्शनमध्ये लिहिले होते. जम्मू आणि आसपासच्या सर्व लोकांना माझे नम्र आवाहन आहे की, कृपया रस्त्यावर येऊ नका, घरीच राहा किंवा अशा जवळच्या ठिकाणी जा, की जिथे तुम्ही पुढील काही तास आरामात राहू शकाल. असे दुसऱ्या पोस्टमध्ये त्यांनी म्हटले. अफवांकडे लक्ष देऊ नका, अफवा पसरवू नका असा सल्ला देतानाच आपण एकत्रितपणे वावर तोडगा काढू, याचा सामना करू असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
