नाशिक दिनकर गायकवाड- नांदूर शिंगोटे ते कोल्हार या महत्त्वाच्या मार्गाच्या सुधारणा कामाचे भूमिपूजन व कोनशिला अनावरण केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्गमंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते उत्साहात पार पडले.
यावेळी राज्याचे मंत्री व अहिल्यानगरचे पालकमंत्री डॉ. राधाकृष्ण विखे पा.,माजी मंत्री अण्णासाहेब म्हस्के, खासदार भाऊसाहेब वाकचौरे, मा.खा. सुजय विखे,तसेच आमदार अमोल खताळ,जिल्हाधिकारी, सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी,स्थानिक लोकप्रतिनिधी व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
हा रस्ता परिसराच्या असून, त्याच्या सुधारामुळे स्थानिक उद्योग,शेती आणि पर्यटन क्षेत्राला मोठा फायदा होगार आहे.यासोबतच औद्योगिक विकासाला चालना मिळेल,
तसेच रोजगार निर्मिती होण्यास मदत होईल.अवजड वाहतूक कोंडी दूर होऊन प्रवासाच्या वेळेची आणि इंधनाची बचत होणार आहे.बाहतूकमध्ये सुधारणा होऊन अपघातांची संख्या देखील कमी होण्यास मदत होईल.आगामी नाशिक महाकुंभ दरम्यान नाशिक नांदूर शिंगोटे कसारे रस्त्यावरील वाढणारी
वाहतूक लक्षात घेता नांदूर शिंगोटे ते कसारे रस्ताही ४ पदरी करण्यात येणार असल्याची घोषणा करण्यात आली.सन २०२५ मध्ये अहिल्यानगर जिल्ह्यात १३८० कोटी रुपयांची ४ नवीन रस्ते प्रकल्पांची कामे मंजूर करण्यात आली असून ६५८ कोटी रुपयां अहिल्यानगर ते सबकखेड व पुढे आष्टी विसापूर रस्त्याचे पेव्हड
शोल्डर सहित २ लेन कार्य, ३८६, कोटी रुपयांसह बेल्हे अलकुरी निघोज शिरूर रस्त्याचे सुधारकार्य आणि ११ कोटी रुपयांसह श्रीगोंदा गावातील लहान पुलाच्या बांधकाम कार्याचेही भूमिपूजन करण्यात आले.
यावेळी बोलताना गडकरी यांनी हा प्रकल्प वेळेत आणि गुणवतेने पूर्ण करण्याचे आश्वासन दिले.
