श्रीरामपूर दिपक कदम येथील अशोकनगर वार्ड नंबर तीन मध्ये भगवान गौतम बुद्धांची २०५५९ वी जयंती नुकतीच साजरी करण्यात आली.भगवान गौतम बुद्धांच्या जयंती निमित्ताने प्रथम ध्वजारोहण करून प.पू भगवान गौतम बुद्ध,डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमांचे पूजन करण्यात आले.
बौद्धाचार्य भाऊसाहेब हिवराळे व निवृत्ती पगारे यांनी त्रिसरण,पंचशील,बौद्ध पूजा, भीमस्मरण,भीमस्तुती हे धार्मिक विधी केले.अशोकनगर कारखान्याचे मा.अध्यक्ष सोपान राऊत यांनी आलेल्या सर्व भाविकांना गौतम बुद्धांच्या जयंती निमित्ताने हार्दिक शुभेच्छा दिल्या तसेच निपाणी वडगावचे मा सरपंच मुरलीनाना राऊत यांनी आपल्या भाषणात भगवान गौतम बुद्धांनी जगाला शांतीचा,प्रितीचा,एकतेचा संदेश देऊन संपूर्ण मानव जातीला एक नवीन रस्ता दाखवून दिला.असे आपल्या भाषणातून सांगितले
निपाणी वडगांव ग्रामपंचायतचे मा.सरपंच रवींद्र पवार यांनी सर्व बौद्ध धर्मीयांना शुभेच्छा दिल्या सामाजिक कार्यकर्त्या मीराताई पारधे यांनी देखील सर्वांना बौद्ध पौर्णिमेच्या शुभेच्छा दिल्या.
कार्यक्रमात अतिशय महत्त्वाची बाब म्हणजे कु.ओवी प्रसाद काळे या आठ वर्षे मुलींने डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनावर पोवाडा गाऊन सर्व पाहुण्यांची व आलेल्या भाविकांची मने जिंकली.सर्व पाहुण्यांनी तिच्यावर कौतुक आणि बक्षिसांचा वर्षाव केला. या कार्यक्रमाकरीता प्रमुख पाहुणे म्हणून अशोक कारखान्याचे माजी अध्यक्ष सोपान राऊत,निपाणी वडगावचे मा. सरपंच रवींद्र पवार, मुरलीनाना राऊत,आबासाहेब राऊत निपाणी वडगावचे विद्यमान सरपंच योगिता देवकर व उपसरपंच जगन्नाथ जाधव, सामाजिक कार्यकर्ते योगेश देवकर, मीरा पारधे, बाळासाहेब ढोरमारे श्री.जाधव, श्री.दांडगे ,ज्योती कदम,भैरवनाथ ढोरमारे हे उपस्थित होते.
कार्यक्रमाच्या शेवटी सरणत्तय घेऊन आलेल्या सर्व पाहुण्यांना व भाविकांना खिरदान करण्यात आली.या कार्यक्रमाकरिता अशोकनगर व निपाणी वडगाव परिसरातील शारदा पारखे,छाया थोरात,श्यामल जाधव, शारदा थोरात,उज्वला जाधव, सविता बोरुडे,सीता बोरुडे,
रोहिणी दांडगे,भिमाबाई येवले, दिपा जाधव,उषा साळवे, शारदा साळवे, पूर्णाबाई थोरात, रोहिणी बोरुडे,पल्लवी थोरात, चंद्रकला थोरात,आशा पारखे, दीक्षा साळवे, वैशाली काळे पद्मा बोराडे,लक्ष्मण मोरे,अजय साळवे,उमेश जाधव,अजय जाधव,दिलीप जाधव,
ताराचंद पारधे, रामदास बोरगे,सिद्धार्थ थोरात, सार्थक साळवे, मुरलीधर साळवे, किरण हिवराळे,अतुल बोरुडे, अजय वैरागर,रऊफ सय्यद, जुबेर सय्यद,संगीता हिवराळे,सौ.महाले, करूणा हिवराळे,राणी हिवराळे, रंजना दाभाडे,संतोष जाधव,सविता जाधव,सुनिता शिंणगारे,कुसुम त्रिभुवन,शकुंतला साळवे,बेबी शिरसाट,द्वारका पारखे,लक्ष्मीबाई मकासरे,,सुरेखा चक्रनारायण, मंगलाबाई कदम या सह अनेक भाविक हजर होते.
कार्यक्रम यशस्वी करण्याकरिता अशोक बोरुडे,गणेश थोरात,नंदू जाधव,अरुण बोरुडे यांनी परिश्रम घेतले.तर शेवटी सर्वांचे आभार प्रशांत राजेंशिंदे यांनी मानले.