संशोधन स्पर्धेतून भारताचे भावी नेते तयार होतील – डॉ. नितीन तळपाडे
आश्वी संजय गायकवाड राज्यस्तरीय शोध निबंध स्पर्धेत इगतपुरीची प्रेरणा शेजवळ अव्वल असल्याची घोषणा पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाचे सिनेट सदस्य प्रा. डॉ. नितीन तळपाडे यांच्या अध्यक्षतेखालील त्रिसदस्यीय निवड समितीने केली असून अशा संशोधन स्पर्धेतून देशाचे भावी नेते तयार होतील असे प्रतिपादन त्यांनी केले.
तळपाडे पुढे म्हणाले मी देशभर विविध स्पर्धा व कार्यक्रमात नेहमी सहभागी होतो.१७ हजाराच्या पुस्तकांचा पुरस्कार मी प्रथमच पहिला.संशोधकांच्या संशोधानासाठी संदर्भ ग्रंथांचे मोठे मोल असते.या स्पर्धेत महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी संशोधन कार्य केलेले संदर्भ ग्रंथ संशोधकांना भेट देण्यात आल्याने डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या सारखा विचार करणारे भारताचे भावी नेते अशा स्पर्धेतून तयार होतील.१२ मे या भगवान बुद्ध व महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या संयुक्त जयंती निमित्त आयोजित राज्यस्तरीय शोध निबंध स्पर्धेच्या सांगता प्रसंगी त्यांनी काढले.
देश - विदेशातून शिक्षण घेतलेल्या तीस जिल्ह्यातील संशोधकांनी या खुल्या शोधनिबंध स्पर्धेत भाग घेतला होता. सुमारे तीन महिन्यापासून सध्याच्या ज्वलंत प्रश्नावर समाजाला दिशा मिळावी या हेतूने संशोधकांची खुली शोध निबंध स्पर्धेचे आयोजिन करण्यात आले होते.
लिखाण, सादरीकरण, नाविन्य,संदर्भ यासारख्या विविध टप्प्यावर संशोधकांचा कस लागला. दुसऱ्या क्रमांक अमरावतीचे प्रज्ञेश बनसोड व सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे संशोधक दिपक तींगेलवार यांना विभागून देण्यात आला. तर तृतीय क्रमांक अहिल्यानगर जिल्ह्यातील वैष्णवी उंबरकर व ठाणे जिल्ह्यातील कल्याण येथील अनिल शहाकर यांना घोषित करून प्रदान करण्यात आला.
सुमारे महिनाभर चालणाऱ्या या दिमाखदार सोहळ्याचे उद्घाटन १४ एप्रिल रोजी आश्वीच्या सरपंच सौ.अलका गायकवाड यांनी ध्वजारोहण करून केले होते.यावेळी त्यांनी जयंती उत्सवाचे कौतुक करताना आपल्या गावाचा नावलौकिक राज्यात वाढत असल्याबद्दल जयंती समितीचे विशेष अभिनंदन केले.
ग्रामअधिकारी प्रवीण इल्हे यांच्या उपस्थित उपसरपंच बाबासाहेब भवर व सोपान सोनवणे व आशा बंडू मुन्तोडे आदी सदस्यांनी ध्वजारोहण करून बुद्ध व बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्यांचे पुष्पपूजन केले.संयोजन समिती पदाधिकाऱ्यांसह ग्रामस्थ मोठ्या संख्येने यावेळी उपस्थित होते. उपस्थितांनी यावेळी सामुहिक बुद्धवंदना कार्यक्रमात सहभाग घेतला.यावेळी संयोजन समितीने चहा व अल्पोपहाराचे वाटप करण्यात आहे. यावेळी राज्यातील सादरीकरण करण्यासाठी आलेले संशोधकही सहभागी झाले होते.
संशोधन सादरीकरण सत्र सरुपचंद गांधी मार्केट येथील भव्य हॉलमध्ये करण्यात आले होते.संयोजन समितीचे कार्याध्यक्ष डॉ. निलेश मुन्तोडे यांच्या उपस्थित परीक्षण समिती प्रमुख प्रा.डॉ.नितीन तळपाडे सदस्य इंजी.आप्पासाहेब गायकवाड व सदस्य जीवन भालेराव यांच्या हस्ते महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकरांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करण्यात आला. यावेळी सादरीकरण सत्र प्रभारी दिलीप बर्डे व सागर खरात यांनी डिजीटल स्लाईड शो व संशोधक सादरीकरण कार्यक्रम व्यवस्थापन अत्यंत प्रभावी केले.संयोजन समितीच्या वतीने दुपारची भोजन व्यवस्था हॉलवर करण्यात आली होती. पत्रकार कक्ष, प्रतिनिधी कक्ष,परीक्षक कक्ष व्यवस्था नामनिर्देशन फलक,पाणी व्यवस्था, ड्रेस कोड मधील स्वयंसेवकाद्वारे सर्व व्यवस्था करण्यात आली.संशोधन सादरीकरण सत्राचे सूत्रसंचालन विकास भडकवाड यांनी केले.
संयुक्त जयंती महोत्सव समितीने १३ व १४ एप्रिल रोजी आयोजित करण्यात आलेल्या खुल्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर करंडक नृत्य स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. सह्याद्री आंतरराष्ट्रीय शाळेने सुवर्ण व रजत पदकांच्या कमाईसह मानाचा डॉ. बाबासाहेब आंबेडकर करंडक जिंकला. शिबलापूर येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळने कांस्य पदकांसह तृतीय क्रमांकाचा करंडक पटकावला.
वैयक्तिक नृत्य स्पर्धेत श्रेया मुन्तोडेने सुवर्ण पदक,दिव्या मुन्तोडे रजत पदक व श्रावणी दुशिंग हिने पटकावले यावेळी संबधित ग्रुपचे मार्गदर्शकांसह स्पर्धकांचा सत्कार करण्यात आला. तत्पूर्वी सर्व स्पर्धक यावेळी आयोजित करण्यात आलेल्या शोभा यात्रेत सहभागी झाले होते.
शोभा यात्रेत शीर्षस्थानी धम्मरथ होता यावेळी रथाचे सारथ्य साधना मुन्तोडे यांनी केले.रथाच्या पाठोपाठ दोन-दोनच्या रांगेने संशोधक,स्पर्धक महिला व पुरुष अनुयायी चालत होते.यावेळी नागरिकांनी शोभायात्रेचे कौतुक केले.यावेळी रेकॉर्डवर मंगलध्वनी लावल्याने गाव व परिसर मंत्रमुग्ध झाला होता. यावेळी चौकात डॉ. बाबासाहेब आंबेडकर करंडक स्पर्धा विजेत्यांनी लेझीम नृत्याचे प्रात्यक्षिक सादर केले व त्याला स्थानिक ग्रामस्थांनी भरभरून दाद दिली. यावेळी संशोधक व स्पर्धकांच्या चालण्याच्या मार्गावर मुलींनी फुलांची उधळण केली.
सांगते प्रसंगी इस्रायल येथून उच्चशिक्षित असलेल्या संशोधक मानसी चव्हाण ,फ्रान्सिस पाळंदे,प्रज्ञेश बनसोड, प्रथम क्रमांकाच्या मानकरी प्रेरणा शेजवळ यांनी मनोगत व्यक्त करून संयोजन समितीचे आभार मानले व बक्षिसाचा योग्य उपयोग करण्याचे आश्वासन दिले. इंजीआप्पासाहेब गायकवाड व जीवन भालेराव व महाराष्ट्र राज्य आर.एस.पी. विभागाचे नाशिक विभागीय समादेशक सिकंदर शेख यांनी मनोगत व्यक्त करताना पडत्या पावसात एकही श्रोता जागेवरून हलला नाही याचे कौतुक करून बुद्धीजीवी लोक समाजात क्रांतिकारी बदल करू शकतात. याचे उदाहरण हा कार्यक्रम असल्याचे सांगितले.
यावेळी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे सहकारी मा. आमदार पी.जे रोहम यांचे नातू संतोष रोहम यांच्या हस्ते सिकंदर शेख यांचा सत्कार केल्याबद्दल मी स्वतःला भाग्यवान मानतो असे सांगितले.
प्रास्तविक भाषणात संजय मुन्तोडे यांनी जयंती समितीचा उद्देश सांगताना कार्यक्रमाच्या पूर्वतयारीचा लेखाजोखा मांडला.अध्यक्षीय भाषण जयंती समितीचे समन्वयक अनिल मुन्तोडे यांनी केले.सूत्रसंचालन सचिव राजेंद्र मुन्तोडे यांनी केले.आभार सुशील मुन्तोडे यांनी केले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी सुरज मुन्तोडे,सिद्धेश मुन्तोडे,सिद्धार्थ मुन्तोडे,शुभम मुन्तोडे,अखिल मुन्तोडे,प्रणय मुन्तोडे,कैलास मुन्तोडे,बाबासाहेब मुन्तोडे,अर्जुन मुन्तोडे,प्रीतम मुन्तोडे,आकाश मुन्तोडे,चंदन मुन्तोडे, रावसाहेब मुन्तोडे,संगिता मुन्तोडे,शिंदे ,अलिशा मुन्तोडे,रेणुका मुन्तोडे,वर्षा मुन्तोडे,शोभा मुन्तोडे,रेखा मुन्तोडे,बाळासाहेब मुन्तोडे,बाळकृष्ण दरेकर,अन्वर शेख ,सेवानिवृत्त पोलीस उपनिरीक्षक भागवत मुन्तोडे व नामदेव मुन्तोडे,भाऊसाहेब मुन्तोडे सर,बबन मुन्तोडे,गौतम मुन्तोडे,एकनाथ मुन्तोडे व प्राचार्य जगदीश मुन्तोडे यांनी विशेष परिश्रम घेतले.